मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आधी कोल्हापूर आणि काल नाशिक मध्ये मराठा मूक आंदोलन पार पडले.दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने २१ दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
संभाजीराजे यांनी काय भूमिका मांडली?
- नाशिकमध्ये काल सकाळी मराठा मूक आंदोलन पार पडले.
- त्यानंतर संभाजी छत्रपतींनी पत्रकार परिषद घेत मूक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
- यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
- या मागण्याची अंमलबजावणीसाठी २१ दिवसांचा कालावधी सरकारने मागितला आहे.
- प्रशासकीय स्तरावर या मागण्यांची अंमलबजावणी होत आहे.
- मात्र असे असले तरी समन्वयकांनी आंदोलन न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- आता सरकारने महिन्याभरात आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल.
- आम्ही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी मूक आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
- त्यानुसार कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आंदोलन पार पडलं.
- राज्यातील ३६ जिल्ह्यात जायची आमची इच्छा नाही.
- आम्हाला समाजाला दिशाहीन नाही तर दिशा द्यायची आहे.
- लाँग मार्च काढण्याची वेळ येऊ नये म्हणून माझी भूमिका
- महिनाभर मूक आंदोलन पुढे ढकलले असले तरी बैठका होत राहणार.
- संभाजीनगर रायगड येथे आंदोलन न होता बैठका होणार
- राज्य सरकारने येत्या गुरुवारपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आशवसन दिले
- आयोग स्थापन करण्यात अडचणी असतील तर गायकवाड कमिशनच्या त्रुटी दूर करण्यासाठी होमवर्क करावा लागेल.
- त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.