मुक्तपीठ टीम
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक व्यक्ती हा निश्चिंत असतो. कारण, पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या विश्वासू असतात. त्यात सुरक्षित आणि चांगला परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिसचे व्याजदरही चांगले आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर ते तुम्ही घरी बसून करू शकता. आता ऑनलाईन एफडी अकाउंट उघडता येणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये एक ते पाच वर्षांसाठी मुदत ठेव म्हणजेच एफडी योजनेची सुविधा आहे. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर निश्चित केले जातात. त्यानुसार गुंतवणूकदारांना या एफडीमध्ये फायदा होतो.
पोस्ट ऑफिसच्या एफडीद्वारे मिळणारा व्याजदर
- पोस्ट ऑफिसमध्ये एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास ५.५०% दराने व्याज मिळते.
- दोन वर्षांच्या एफडीवर ५.७०% व्याजदर आहे.
- ३ वर्षांच्या एफडीवर ५.८०% आणि ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.७०% व्याजदर आहे.
- पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. हे तुम्ही घरबसल्या करता येते.
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी अकाउंट कसे उघडायचे?
- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंट उघडण्याची सुविधा इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे प्रदान केली जाते.
- नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्डसह https://ebanking.indiapost.gov.in वर लॉग इन करा.
- जनरल सर्व्हिसेस या पर्यायावर जा आणि सर्व्हिस रिक्वेस्टवर क्लिक करा.
- नवीन रिक्वेस्ट पर्यायावर जा आणि एफडी अकाउंट उघडण्यासाठी अर्ज करा.
- आता रिक्वेस्ट केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल.
- पडताळणीनंतर एफडी अकाउंट उघडले जाईल.
पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एफडी अकाउंट कसे उघडायचे?
- जर ऑनलाइन एफडी अकाउंट उघडण्यात अडचण येत असेल तर ते ऑफलाइन देखील उघडता येते.
- यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
- तेथे एफडी अकाउंट उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून आवश्यक माहिती घ्यावी लागेल.
- आवश्यक कागदपत्रे सबमिट करून एफडी अकाउंट उघडू शकता.