मुक्तपीठ टीम
पोर्शने भारतातील यूज्ड कार व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीला आशा आहे की या व्यवसायामुळे लक्झरी कार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि नव्या लक्झरी कारची मागणीही वाढेल.
पोर्श कंपनीचा पोर्श अप्रुव्ड प्रोग्राम
- जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत लक्झरी कार पोहचवण्यासाठी पोर्शने प्री-ओन्ड कार प्रोग्राम सूरू केला आहे, ज्याला पोर्श अप्रुव्ड म्हणून ओळखले जाते.
- या कार्यक्रमांतर्गत, लोक या प्लॅटफॉर्मवर त्यांची कार विकू शकतात, व वापरलेली कार कमी किमतीत खरेदी करू शकतात.
प्री-ओन्ड कार सेगमेंट
पोर्श इंडियाचे ब्रँड डायरेक्टर, मॅनोलिटो वुजिसिक म्हणाले, “पोर्श इंडियासाठी प्री-ओन्ड कार सेगमेंटमध्ये आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण ज्यांनी कधीही नवीन पोर्श घेतलेली नाही, त्यांच्यापर्यंत पोर्शची लक्झरी कार पोहचवण्याची ही संधी आहे.
कोणत्या सुविधा उपलब्ध होतील?
- पोर्शने मंजूर केलेला कार्यक्रम प्री-ओन्ड कारवर १२ महिन्यांसाठी वॉरंटी उपलब्ध आहे.
- या प्लॅटफॉर्मवर कारची विक्री करताना, कंपनी कारची १११-पॉइंट चाचणी करते, ज्यामध्ये प्रत्येक वाहनाला त्याचे स्टैंडर्ड पूर्ण करावे लागतील.
- यासोबत रोड साइड असिस्टंस सर्व्हिस दिली जाईल.
- ग्राहक या प्लॅटफॉर्मवर कार खरेदी, विक्री किंवा देवाणघेवाण करू शकतात.