Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉर्नचा गुन्हा, राज कुंद्रा गजाआड…एक अभिनेत्री मदतीला, तीन विरोधात!

अभिनेत्री गहेना म्हणते पॉर्न आणि एरोटिकमधील फरक समजून घ्या!

July 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
raj kundra

मुक्तपीठ टीम

मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडीओंच्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक केली. या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. एकीकडे एका अभिनेत्रीनं नग्नावस्थेत ऑडिशनसाठी सक्ती केल्याच्या आरोपासह तीन अभिनेत्रींचे आरोप कुंद्राच्या अटकेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. दुसरीकडे पॉर्नच्याच गुन्ह्यात अटक झालेली अभिनेत्री गेहाना वशिष्ठच्या वतीने जारी करण्यात आलेलं निवेदन या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळा दृष्टीकोन मांडणारे आहे. गहेनाने मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त करतानाच पॉर्न आणि एरोटिक म्हणजे उत्तेजक व्हिडीओमधील फरक समजून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

काय म्हणाली गहेना वशिष्ठ?

  • ‘कायदा त्याच्या स्वत: च्या मार्गाने कार्य करेल.
  • आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.
  • मुंबई पोलीस दल हे जगातील सर्वोत्तम फोर्स आहे.
  • सुनावणीनंतर खरा दोषी कोण आहे ते न्यायालय ठरवेलच.
  • तसेच ज्यांना अटक झाली आहे, त्यांना दुसरे वापरून घेत आहेत.

एकीकडे गहेना राज कुंद्राला मदत होईल असं विधान करत आहे. तर दुसरीकडे काही अभिनेत्रींचे जुने आरोप आता पुन्हा चर्चेत आले आहेत.

 

तीन अभिनेत्रींचे राज कुंद्रावर आरोप

  • शर्लिन चोप्राने राज कुंद्रानेच तिला एडल्ट फिल्मच्या क्षेत्रात आणल्याचे आधीच म्हटले आहे. एक प्रकारे तिने त्यासाठी राजला जबाबदार ठरवले.
  • पूनम पांडेने तर तिच्या मर्जीविरोधात तिचे व्हिडीओ वापरल्याची तक्रारही केली.
  • सर्वात गंभीर आरोप अभिनेत्री सागरिका शोना सुमनने माध्यमांसमोर येऊन केला होता.
  • तिने राज कुंद्रावर नग्नावस्थेत ऑडिशन्स देण्याची मागणी केल्याचा आरोप केला होता.

 

सागरिकाचे शोनाचे गंभीर आरोप

सागरिका शोना म्हणाली की “मी एक मॉडेल आहे आणि मी गेल्या तीन-चार वर्षांपासून या उद्योगात काम करत आहे. मी जास्त काम केलेले नाही. लॉकडाऊन दरम्यान माझ्याबरोबर घडलेल्या काही गोष्टी मला उघड करायच्या आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये मला उमेश कामतचा फोन आला आणि मला राज कुंद्रा तयार करणार असलेल्या वेब सिरीजची ऑफर दिली. जेव्हा मी त्यांना राज कुंद्राबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत.

 

‘व्हिडिओ कॉलवर ऑडिशनच्या नावाखाली मला न्यूड ऑडिशनच्या ऑफर आल्या आहेत. हे तीन लोक होते. त्यापैकी एक उमेश कामत होता. एकाचा चेहरा दिसत नव्हता पण तो बहुधा राज कुंद्रा होता. कारण उमेश कामत हे राज कुंद्राचे नाव घेत होते की सध्या चालू असलेल्या सर्व साइटचे ते मालक आहेत. माझी मागणी आहे की त्यांना अटक करावी. त्यांना अटक का केली जात नाही? त्यांच्याकडे बर्‍याच साइट चालू आहेत. मला वाटते की तेथेच मुख्य दुवा आहे.

 

त्यावेळी सागरिकाच्या आरोपांनंतर राज कुंद्रा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की कोणीही कोणालाही दोष देऊ शकेल, याचा अर्थ ती बातमी आहे असे नाही.


Tags: gehana vasisthraj kundraSharlin Chopraगेहाना वशिष्ठपूनम पांडेराज कुंद्राशर्लिन चोप्रासागरिका शोना सुमन
Previous Post

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरातही बैठका, कोरोनाविषयक आढावा घेत दिल्या प्रशासनाला सूचना

Next Post
CM

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरातही बैठका, कोरोनाविषयक आढावा घेत दिल्या प्रशासनाला सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!