Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडून येण्याची पात्रता आता ‘खर्च करू शकण्याची कुवत’ ही झाली! वाचा पोपटराव पवारांनी मांडलेलं विदारक वास्तव…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
popatrao Pawar

मुक्तपीठ टीम

पूर्वी लोकप्रतिनिधीची निवडून येण्याची पात्रता ही त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होती, पण आज ते तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवारांनी व्यक्त केले आहे. निवडणूक ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असावी, असेही त्यांनी सांगितले.

 

इतरांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने काम करा

  • सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात आयोजित जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.
  • पोपटराव पवार यांनी या मनोगतातून आजच्या निवडणुकीत पैसा खर्च करुन विजयी होणार्‍यांना टोला लगावला असल्याचे बोलले जात आहे.
  • पैसा ही विकासासाठी समस्या नाही, गावाचा विकास करण्यासाठी मानसिकता असणे ही मोठी समस्या, टीका टीपण्णी करण्यापेक्षा,इतरांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने काम करा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिघांनी एकत्र येवून काम केले तरच स्वावलंबी गाव आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करु शकतो.

 

निवडणूक प्रक्रिया ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी…

  • अलीकडच्या काळात कामाला विरोध करुन सत्तेत जाण्याचा मार्ग राहिला आहे.
  • निवडणूक प्रक्रिया ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असली पाहिजे.
  • निवडणुकीची व्यवस्था खूप बदललीय, आपण निवडून आलेल्या प्रतिनिधीला विधानसभेत जाऊन भाषण करण्याची संधी देत नाही.
  • लोकप्रतिनिधींना शनिवार आणि रविवारी मतदारसंघात यावं लागतं.
  • अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न, वाढदिवस, बारसं, सण आणि उत्सव या व्यक्तिगत कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो.
  • आपण वैयक्तिक कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो मात्र सामुदायिक कामासाठी बोलावलं पाहिजे.
  • हे चित्र येणाऱ्या काळात बदलेलं असं आपण आशावादी राहुया.

केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका

  • जिंकला की हवेत उडायच नाही, आणि हरलाच तर नैराश्यामध्ये जायचे नाही.
  • गावात महापुरूषांचे पुतळे नाहीत.
  • महापुरूषांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत, पक्ष, पद बाजूला ठेवून संस्काराच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
  • केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका.
  • काही उद्देश ध्येय डोक्यासमोर ठेवा.
  • तर तुम्हीसुध्दा तुमचे गावाचा हिवरे बाजारप्रमाणे विकास घडवू शकता.
  • गावाचे नेतृत्व हा सरपंच करत असतो.
  • सरपंचाने सर्वांना सोबत घेवून शासनाच्या योजना लोहसहभागातून राबविल्या तर प्रत्येक गाव स्वावलंबी होईल.

Tags: elective meritpopatrao pawarनिवडणूक प्रक्रियापोपटराव पवार
Previous Post

काशी विश्वनाथ धाम आता अद्भुत आणि अविस्मरणीय महाक्षेत्र! पाहाताच डोळे दिपवणार!

Next Post

शिवसेनेविरोधात फडणवीस आक्रमक! मुंबई मनपात खाल्लेला एक-एक पैसा बाहेर काढणार!!

Next Post
Devendra Fadanvis on BMC Curption

शिवसेनेविरोधात फडणवीस आक्रमक! मुंबई मनपात खाल्लेला एक-एक पैसा बाहेर काढणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!