मुक्तपीठ टीम
नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमानं इतिहासात अजरामर झालेला किल्ला सिंहगड. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द पाळत किल्ला सर करण्यासाठी त्यांनी प्राणांचीही आहुती दिली. एकीकडे अभिमान बाळगावा असा पराक्रमी वारसा तर दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची उधळण. त्यामुळे स्वाभाविकच हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. मात्र, त्याला साजेशा सोयी सुविधा मात्र तिथं नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहगड किल्ला व पर्यटन विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर ईलेक्ट्रिक वाहनांसह अन्य सुविधा पुरवण्याच्या दिशेने कामाला सुरुवातही झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहगड किल्ला व पर्यटन विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून येथे विविध सोयीसुविधा करणे आवश्यक आहे. pic.twitter.com/y7xkh2Mdm5
— Supriya Sule (@supriya_sule) September 17, 2021
हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून येथे विविध सोयीसुविधा करणे आवश्यक असण्यावर चर्चा झाली. त्यानंतर वन विभागाच्यावतीनं तिथं ईलेक्ट्रिक वाहन सुरू करण्याची योजना आखली आहे. एका ठराविक टप्प्यानंतर खासगी वाहनांना प्रवेश नाकारुन ईलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास करावा लागेल. त्यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषण राखता येईल. १५ ई-बसेस चालवण्यासाठी पीएमपीएमएल सोबत करार करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी नुकतीच किल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी गावातील स्थानिकांसोबत संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.
सिंहगड किल्ला pic.twitter.com/Gm1iYTgPGE
— रानवाटाड्या (@Abhi_Thosar) January 3, 2021
काय ठरलं गावातील बैठकीत?
- त्यांनी बारावी झालेल्या ३० स्थानिक तरूणांची निवड केली आहे, जे गडावर मार्गदर्शक म्हणून काम करतील.
- आणि या ३० तरूणांना २ इतिहासकार किल्याच्या इतिहासाचे प्रशिक्षण देतील.
- १५ ई-बसेस चालवण्यासाठी पीएमपीएमएल सोबत करार करणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
- गडावरील प्लास्टिक बंदीवर वन अधिकारी काम करत आहेत असेही पाटील यांनी सांगितले.
- सिंहगड येथील वनविभागाच्या मार्गदर्शकांनी ई-वाहनांची योजना केली आहे.
- ठराविक ठिकाणी खाद्यपदार्थांची दुकाने, ३० मार्गदर्शकांचे पथक निर्माण करणे आणि ई-वाहने चालवणे असे काही महत्वाचे बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- वनविभागाच्या पुणे विभागाने किल्यावर सुव्यवस्था करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.