Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेत्यांची माणुसकी अनलिमिटेड, डॉ. कराडांनी विमानात जीव वाचवला, इतरही नेते नाहीत मागे!

November 18, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
supriya sule and rajvardhan patil

मुक्तपीठ टीम

डॉक्टरच्या रूपात देवच संकट काळात धाऊन येतो! असे म्हणतात ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सिद्ध केले आहे. सोमवारी डॉ.भागवत कराड हे दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट मधुन प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली. क्रू मेंबर्सनी मदतीसाठी आवाहन केल्याचे ऐकून केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रवाशावर प्राथमिक उपचार करून त्याचा जीव वाचवला. भूतकाळात इतरही राजकीय नेत्यांनी गरजूंच्या मदतीला धावून जात माणुसकी अनलिमिटेड असल्याचे दाखवून दिले आहे. ताजे उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीचे आहे.

 

पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक!

  • केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांच्या तत्परतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
  • केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांच्या या कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.
  • याबाबत इंडिगो एअरलाइन्सने देखील केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांचे कौतुक केले असून, ट्विटच्या माध्यमातुन कृतज्ञता व्यक्त केली आहे.
  • एअरलाइनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कर्तव्याप्रती सदैव जागरुक राहिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री यांचे मनापासून कौतुक करतो. डॉ. भागवत कराड सहप्रवाशाला मदत करण्यासाठी तुमचा ऐच्छिक पाठिंबा खूप प्रेरणादायी आहे.’

 

कौतुकाबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत ‘सेवा आणि समर्पण’ यातून देश आणि जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी चालत असल्याचे म्हटले आहे.

 

मदतीसाठी प्रोटोकॉलही मोडला

प्रवाशाला मदत करण्यासाठी डॉ.कराड यांना केंद्रीय मंत्री म्हणून प्रोटोकॉल तोडावा लागला, मात्र त्यांची ही प्रतिक्रियेने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मन त्यांनी जिंकले. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. डॉ.कराड यांनी ही संपूर्ण घटना आणि त्यांचा अनुभव त्यांच्या फेसबुक पोस्टवर शेअर केला आहे. डॉ भागवत कराड हे महाराष्ट्राचे खासदार आहेत आणि जुलै २०२१ मध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून मोदी सरकारमध्ये सामील झाले.

 

कशी केली मदत?

राजकीय क्षेत्रात पक्ष भिन्न असलेले मात्र अडचणीच्या प्रसंगी एकत्र येऊन केलेल्या मदतीमुळे माणुकीचं चांगल उदाहरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी दिलं आहे. नुकतीच सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी पुण्यातील अपघातग्रस्तांना एकत्रित मदत केल्याचं पाहायला मिळालं. राजवर्धन पाटील यांनी वाहनाची व्यवस्था केली तर सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून अपघातग्रस्तांना ताबडतोड मदत होईल असे प्रयत्न केले.

 

काय आहे प्रकरण?

  • बारामती इंदापूर रोड वरील अंथुर्णे येथे वाहनाचा अपघात झाला होता.
  • या मार्गाने प्रवास करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघात पाहून गाडी थांबवली.
  • त्याच मार्गावरून जाताना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनीही थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांना मदत केली.

पाहा व्हिडीओ: 


Tags: baramatiDr. Bhagvat karadHarshvardhan PatilIndapur RoadRajvardhan Patilsupriya suleइंदापूर रोडबारामतीराजवर्धन पाटीलराज्यमंत्री डॉ.भागवत कराडसुप्रिया सुळेहर्षवर्धन पाटील
Previous Post

राज्यात १,००३ नवे रुग्ण, १,०५२ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, पश्चिम द्रुतगती महामार्गाचं अंशतः काँक्रीटीकरण

Next Post
Concreting of Western Expressway

फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, पश्चिम द्रुतगती महामार्गाचं अंशतः काँक्रीटीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!