मुक्तपीठ
पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी पुण्यातील वानवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या सोबत तिथे तिचा भाऊ आणि मित्र देखील राहत होते. या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय गदारोळ माजला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या संशयित मृत्यूचे सत्य अजून ही समोर आले नाही, परंतु या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी मधील एक अरूण राठोड यांच्या जवळील व्यक्ती आहे. या प्रकरणांची गांभिर्याने
चौकशी केली जावी म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठविले आहे.
पूजा चव्हाण यांच्या केसपेपरवर पूजा अरूण राठोड असे नाव आढळून आले आहे. पूजा चव्हाण यांच्या वडिलांनी सांगितले आहे की, पूजाची बदनामी करू नका, कारण तिने आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केली आहे. तसेच अशा प्रकरणात विनाकारण कोणाचे ही नाव घेणे चुकीचे आहे. पूजाचे वडील शेतात पूजाचा पुतळा उभारणार आहेत. तसेच पूजाची ज्या डॉक्टरांनी तपासणी केली ते डॉक्टर देखील रुग्णालयात येत नाहीत.