मुक्तपीठ टीम
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत महत्वाचा नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार करण्यात आले. नक्षलवादी कारवायांना यामुळे आळा घालण्याच्या कामात झालेली ही महत्त्वाची घटना आहे. यामुळे पोलिसांचा आत्मविश्वासही वाढला आहे, त्याचप्रमाणे स्थानिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला असल्याचेही दिसून येत आहे, असे मत महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक (डीजीपी) प्रवीण दीक्षित यांनी रविवारी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी या संवादाचे सूत्रसंचालन केले. गडचिरोली जिल्हात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या नक्षलवादविरोधी कारावाईसंबंधात हा संवाद साधला गेला. तेथे सी ६० ने केलेली कामगिरी, तसेच स्थानिक स्तरावर गेल्या काही काळामध्ये पोहोचलेला विकास आणि स्थानिक लोकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाची भावना यामुळे आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही.
या संबंधात अधिक माहिती देताना आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना निवृत्त पोलीस महानिरीक्षक (डीजीपी) प्रवीण दीक्षित पुढे म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र दले, त्यांचा समन्वय तसेच पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडून मुख्य सचिव पोलीस प्रमुख यांच्याशी असणारा संवाद हे चालू आहे. ितकेच नव्हे तर राज्याराज्यांमध्ये कनिष्ठ पोलीस म्हमजे अधीक्षक स्तरावरही परस्परांमध्ये देवाणघेवाण असल्याने नक्षलवादी कारवायांना आळा घालमे बऱ्याच अंशी शक्य होत आहे. कोब्रा युनिटच्या प्रशिक्षणाचाही फायदा नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा वापर नक्षलवाद्यांविरोधातली कारवायांमध्ये कसा महत्त्वाचा असू शकेल, त्याबद्दल दीक्षित म्हणाले की, नक्षलवाद्यांच्या जंगली भागातील कारवायांमध्ये हेलिकॉप्टरचा वापर केला जाऊ शकतो, मात्र काही धोरणांमुळे त्यांचा पुरेसा वापर करता येत नाही. मात्र ड्रोनचा वापर करता येऊ शकेल, तो ही सध्या सीआरपीएफ करीत असून तो वाढवणे आवश्यक आहे. अबुजमल पहाडाचे उदाहरण त्यांनी देताना सांगितले की, पोलीस कारवाई करताना डोंगराच्या पायाशी असतात आणि नक्षलवादी वर असतात त्यावेळी पोलिसांना वरची स्थती कळण्यासाठी आणि प्रभावी कामगिरी करण्यासाठी ड्रोनचा वापर करायला हवा. ड्रोनचे तंत्र, विकसित तंत्र त्याचप्रमाणे उपग्रह मार्गदर्शक तंत्रप्रणाली याचाही फायदा घ्यावा. महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी हे सारे उपयोगी पडू शकेल.
वनवासी या संज्ञेबद्दलही माहिती देतना आणि ती स्थिती बदलणे गरजेचे आहे. ब्रिटिश वसाहतवादी राजवटींने आदिवासींची संस्कृती कायम राहावी म्हणून काही कायदे केले त्याचा फायदा झालेला नाही. स्वातंत्र्यानंतरही तेथे त्यामुळे विकास पोहोचू शकला नाही. यामुळे ख्रिस्ती मिशनरी तेथे जाऊन धर्मांतर करवतात, डावे अतिरेकी गटही त्याचा गैरफायदा घेतात. मुळात भारतीय सशस्त्रदले परदेशा आक्रमणाविरोधात प्रभावी असली तरी या अंतर्गत परिस्थितीत फोडण्याचे काम केले जात आहे. (फोडा झोडा अशा नीतीप्रमाणे हे होत असून गेली ७० वर्षे ते चालू आहे.य यामुळे त्याचा गैरफायदा ख्रिश्चन मिशनरीजनी घेतला. छत्तीसगड, गडचिरोली, आंध्र येथे घेतला. बाहेरची माणसे येतील तुमचे अन्य व परंपरा हिसकावतील, असे वनवासींच्या मानावर बिंबवले गेले. त्यामुळे त्यांना बाजूला ठेवले गेले. त्यामुळे भारत फोडण्याचे धोरण चालू राहिले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल लक्ष वेधले होते. पण कारवाई काही त्यादृष्टीने केली गेली नसल्याचे दीक्षित म्हणाले.
तळातील लोकांपर्यंतही विकासकामे पोहोचली पाहिजेत, जी गेल्या काही वर्षात झाली आहेत. या अनुषंगाने हे महत्त्वाचे मुद्दे दीक्षित यांनी मांडले असल्याचे सांगत येत्या काही काळात याकडे लक्ष दिले जाईल. अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सांगून महाजन यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत रविवारी १४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी ब्रिगेडिअर हेमंत महाजन ((निवृत्त) यांनी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रवीण दीक्षित यांच्याशी गडचिरोतील नक्षलवादविरोधी कारवाईबाबत ऑनलाईन संवाद साधला.