मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राजधानी मुंबईत कोरोनाने कहर केला असल्याने चिंता वाढली आहे, त्यातच आता जे जे रुग्णालयातील ६१ निवासी डॉक्टरांना करोनाची लागण झाली. या सर्व डॉक्टरांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता पोलीस दलाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून शक्य असेल तर ५५ वर्षे पेक्षा अधिक आणि इतर व्याधी असलेल्या पोलिसांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
आतापर्यंत राज्यातील १८० डॉक्टर कोरोनाने बळी
- जे. जे रुग्णालयातील ६१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं दिली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील १८० डॉक्टर कोरोनाचे बळी ठरले आहेत.
- त्यापैकी जेजे रुग्णालयातील ६१, टिळक रुग्णालयातील ३५, केईएम रुग्णालयातील ४० आणि नायर येथील ३५ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना WFH!
- मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून त्यात पोलीस दलात देखील हा संसर्ग वाढत आहे.
- मुंबई पोलिस दलामध्ये सध्यस्थितीत १५४ सक्रिय रुग्ण असून राज्यात २१९ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे.
- ही संख्या अधिक वाढू नये यासाठी पोलिस वसाहती, पोलिस ठाणी, पोलिसांची शासकीय वाहने यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना पोलीस महासंचालक कार्यालकडून देण्यात आलेल्या आहेत.
- तसेच ५५ वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृद्य शस्त्रक्रिया, कर्करोग, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रतिरोपण या आजाराने ग्रासलेल्या पोलिसांना शक्य झाल्यास घरी बसूनच काम द्या, तसेच त्याच्या आजाराचा आढावा घेऊन ते लोकांच्या संपर्कात येणार नाही, किंवा कमी संपर्कात असेल अशा ठिकाणी त्याची नेमणूक करावी, असे निर्देश पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयात भरतीसाठी रुग्णांना मुंबई मनपाची परवानगी घ्यावी लागणार
- दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोरोना रुग्णांना मुंबई मनपाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
- तशा सूचना मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांन दिल्यात.
- कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई मनपानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
- खासगी रुग्णालयांना ८० टक्के कोरोना बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आलंय.
- तसंच सरकारनं निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.