मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने राज्यासह पुण्यात कडक निर्बंध लावण्यात आहेत. यामुळे पुणे परिवहनच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे सतराशे बदली हंगामी रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे काम नाही. त्यामुळे लाकडाऊनकाळातील पगार त्यांना मिळालेला नाही. गेल्यावर्षीसुद्धा पाच महिने पगार मिळाला नसल्याने हंगामी बदली, रोजंदारी कर्मचारी कर्जबाजारी झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या रोजंदारी सेवकांनी पत्र लिहिले आहे. ते पत्र त्यांच्याच शब्दात-
प्रती,
विषय-पुणे महानगर परिवहन महामंडळातील बदली रोजंदारी कामगारांचे 1 महिन्याचे वेतन मिळाले नाही
अर्जदार-सर्व बदली रोजंदारी कर्मचारी.
महोदय,
विनंती अर्ज करत आहोत की, सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु असल्याने महाराष्ट्र शासन यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे.परिणामी सध्या PMPML बससेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहे. कामाची इच्छा असुनही आम्ही कामावर जाउ शकत नाही,तरी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी करून सर्व कर्मचारी वर्गाचे पगार अदा करण्याचे सांगितले असूनही अद्याप आम्हाला वेतन नाही. मागील लॉकडाऊन मध्ये पण ५ महिने पगार केलेला नाही. तो प्रश्न अजून प्रलंबित आहे. परिणामी आमच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. मा.कामगार आयुक्त. पुणे साहेब. यांनी लेखी आश्वासन दिल असून पगार हा द्यावा लागेल. तरीही पगार दिला नाही विरोधी पक्ष नेत्या व महापौर स्थायी समिती अध्यक्ष. संचालक. सर्वाना पत्रव्यहार केले आहे तरी पण पगार होत नाही तरी आपण आमच्या विनंती अर्जाचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन संबंधित प्रकरणाची चौकशी करून प्रशासनास आमची दखल घ्यावी. ही नम्र विनंती. म्हत्वाचे म्हणजे आम्ही कंत्राटी नसुन प्रशासकीय नियमानुसार सरळ सेवा भरती झालेलो सेवक आहोत त्यामध्ये चालक, वाहक, फिटर, सफ़ाई कामगार असे २१०० कर्मचारी आहे .
कळावे,
आपले नम्र सेवक, सर्व बदली रोजंदारी सेवक
पुणे महानगर परिवहन
महामंडळ लि.पुणे