Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळू शकतात पंतप्रधान विमा योजनेतून २ लाख

September 6, 2026
in आरोग्य
0
PMJJBY

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून बाधित रुग्णांचे रोजच मृत्यू होत आहेत. ही संख्या ही मोठी आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर आर्थिकृष्ट्या संकटात आल्याने कुटुंबाचे हाल होत आहेत. काहींवर उपासमाराची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच पीएमजेजेबीवायच्या अंतर्गत कुटुंबातील सदस्याला २ लाख रुपये मिळू शकतात.

 

पैसे कोणाला मिळणार?

  • जर एखाद्या व्यक्तीने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला दोन लाख रुपये मिळतील.
  • ६ वर्षांपूर्वी भारत सरकारने सुरू केलेली ही टर्म योजना आहे.
  • ती खरेदी करणार्‍याला वर्षाकाठी ३३० रुपये जमा करावे लागतात.
  • भूकंप, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यूला कवर करते.
  • आत्महत्या आणि हत्येसारख्या मृत्यूमध्येही एखाद्याला त्याअंतर्गत विमा संरक्षण मिळते.
  • जरी पंतप्रधान जीवन ज्योती योजना विकत घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असला तरीही बँकेला त्याच्या नॉमिनीला दोन लाख रुपये द्यावे लागतील.
  • या विमा योजनेत कोणतीही व्यक्ती १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान गुंतवणूक करू शकते.

 

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या अटी व शर्ती

  • पीएमजेजेबीवाय योजना एलआयसी आणि इतर खाजगी जीवन विमा कंपन्यांद्वारे राबवली जाते
  • एखादी व्यक्ती पीएमजेजेबीवायशी केवळ विमा कंपनी आणि बँक खात्यासह जोडलेली असू शकते.
  • पीएमजेजेबीवायचा हक्क मिळविण्यासाठी, विमाधारकाचे नामनिर्देशित / उत्तराधिकारी यांनी ज्या शाखेत खाते आहे अशा बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.
  • विमा खरेदी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यास किमान ४५ दिवसांनी पीएमजेजेबीवाय मधील विमा संरक्षण हप्त्याचा दावा स्वीकारला जातो. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला, तर ही अट लागू होत नाही.
  • जॉइंट बँक खातेदारांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाते धारकांना वार्षिक प्रीमियम भरावा लागेल.

Tags: pmjjbyपंतप्रधान विमा योजना
Previous Post

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या तीन लाखांखाली! मुंबईत नवे रुग्ण पुन्हा एक हजाराखाली!!  

Next Post

“अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण”- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Next Post
varsha gaikwad

"अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण"- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!