Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा: फक्त ६५ तास, तब्बल २० बैठका! नॉनस्टॉप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा संपवून भारतात परत आले आहेत. त्यांनी तेथे जाताना परंपरेप्रमाणे जर्मनीचा स्टॉप न घेता थेट प्रवासासाठी वापरलेल्या एअर इंडिया वन विमानाची चर्चा झाली. आता दौरा संपवून परत आल्यानंतर त्यांची दौराशैलीही चर्चेत आली आहे. पंतप्रधान मोदी २० बैठकांना उपस्थित होते. केवळ ६५ तासांचा दौरा असतानाही त्यांनी एवढी झपाट्यानं कामं केलीत.

 

सुपरफास्ट अमेरिका दौरा 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्याहून परतले.
  • त्यांचा हा दौरा ६५ तासांचा होता.
  • ते सलग २० बैठकांमध्ये उपस्थित होते.
  • अगदी विमानात देखील त्यांच्या बैठका सुरु होत्या.
  • अमेरिकेला जाताना आणि तेथून परतताना पंतप्रधानांनी विमानात अधिकाऱ्यांसोबत ४ बैठका घेतल्या.
  • बुधवारी अमेरिकेला जाताना मोदींनी विमानात २ आणि तेथे पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये ३ बैठका घेतल्या.

 

राजकीय नेते ते कॉर्पोरेट सीईओ…बैठकांचं सत्र!

  • २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत ५ बैठका घेतल्या.
  • पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली.
  • त्यांनी जपानी पंतप्रधान योशीहिडे सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

 

कमी वेळेत भरगच्च कार्यक्रम!

  • या दौऱ्या दरम्यान पंतप्रधानांनी ३ अंतर्गत बैठकांचे अध्यक्षस्थानही भुषवले.
  • पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.
  • अमेरिकन अध्यक्षांच्या बैठकीनंतर मोदींनी क्वाडच्या शिखर परिषदेत भाग घेतला.
  • २४ सप्टेंबर रोजी त्यांनी ४ अंतर्गत बैठकाही घेतल्या.
  • २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेहून भारतासाठी परतताना पंतप्रधानांनी विमानात २ बैठका घेतल्या.

 

याआधी पंतप्रधानांचा अमेरिका दौरा त्यांच्या नव्या विमानामुळे चर्चेत होता. त्यांच्या एअर इंडिया वन विमानाची तुलना अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या विमान एअर फोर्स वनशी केली जात होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानाप्रमाणे, एअर इंडिया वन विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. उडते पंतप्रधान कार्यालय असणाऱ्या या विमानाप्रमाणेच आता हा बैठकांचा वेग देखील सर्वांचे लक्ष वेधत आहे.


Tags: AmericaIndiaPM Narendra modiPMOअमेरिका दौरापंतप्रधान नरेंद्र मोदीभारत
Previous Post

अंधश्रध्देवर ८२ व्या वर्षीही सळसळत्या उत्साहानं तुटून पडणाऱ्या ‘भारत कन्या’ प्रभा पुरोहित!

Next Post

आज राज्यात ३,२०६  नवे रुग्ण, ३,२९२ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

आज राज्यात ३,२०६  नवे रुग्ण, ३,२९२ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!