मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा संपवून भारतात परत आले आहेत. त्यांनी तेथे जाताना परंपरेप्रमाणे जर्मनीचा स्टॉप न घेता थेट प्रवासासाठी वापरलेल्या एअर इंडिया वन विमानाची चर्चा झाली. आता दौरा संपवून परत आल्यानंतर त्यांची दौराशैलीही चर्चेत आली आहे. पंतप्रधान मोदी २० बैठकांना उपस्थित होते. केवळ ६५ तासांचा दौरा असतानाही त्यांनी एवढी झपाट्यानं कामं केलीत.
सुपरफास्ट अमेरिका दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्याहून परतले.
- त्यांचा हा दौरा ६५ तासांचा होता.
- ते सलग २० बैठकांमध्ये उपस्थित होते.
- अगदी विमानात देखील त्यांच्या बैठका सुरु होत्या.
- अमेरिकेला जाताना आणि तेथून परतताना पंतप्रधानांनी विमानात अधिकाऱ्यांसोबत ४ बैठका घेतल्या.
- बुधवारी अमेरिकेला जाताना मोदींनी विमानात २ आणि तेथे पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये ३ बैठका घेतल्या.
राजकीय नेते ते कॉर्पोरेट सीईओ…बैठकांचं सत्र!
- २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत ५ बैठका घेतल्या.
- पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली.
- त्यांनी जपानी पंतप्रधान योशीहिडे सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
कमी वेळेत भरगच्च कार्यक्रम!
- या दौऱ्या दरम्यान पंतप्रधानांनी ३ अंतर्गत बैठकांचे अध्यक्षस्थानही भुषवले.
- पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.
- अमेरिकन अध्यक्षांच्या बैठकीनंतर मोदींनी क्वाडच्या शिखर परिषदेत भाग घेतला.
- २४ सप्टेंबर रोजी त्यांनी ४ अंतर्गत बैठकाही घेतल्या.
- २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेहून भारतासाठी परतताना पंतप्रधानांनी विमानात २ बैठका घेतल्या.
याआधी पंतप्रधानांचा अमेरिका दौरा त्यांच्या नव्या विमानामुळे चर्चेत होता. त्यांच्या एअर इंडिया वन विमानाची तुलना अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या विमान एअर फोर्स वनशी केली जात होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानाप्रमाणे, एअर इंडिया वन विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. उडते पंतप्रधान कार्यालय असणाऱ्या या विमानाप्रमाणेच आता हा बैठकांचा वेग देखील सर्वांचे लक्ष वेधत आहे.