Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“खेळाडूंचे लसीकरण ते प्रशिक्षण, सर्व गरजा प्राधान्याने पूर्ण करणार”

ऑलिम्पिक्स तयारी आढाव्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 4, 2021
in सरकारी बातम्या
0
Tokyo Olympics

मुक्तपीठ टीम

टोक्यो ऑलिम्पिक सुरु होण्यासाठी केवळ ५० दिवस शिल्लक राहिले असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील ऑलिम्पिक तयारीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या ऑलिम्पिक तयारीविषयी माहिती देणारे सादरीकरण केले. ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणातले सातत्य, महामारीच्या काळातही कायम होते. त्यांच्या प्रशिक्षणात कोणतेही अडथळे आले नाहीत, अशी माहिती, या आढावा बैठकीत, पंतप्रधानांना देण्यात आली. त्याशिवाय, ऑलिम्पिक कोट्यानुसार प्रवेश मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग, खेळाडूंचे लसीकरण आणि वैयक्तिक प्रशिक्षण तसेच मदत त्यांना पुरवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

 

खेळाडू आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या सहायक चमूच्या लसीकरणाबाबतही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. टोक्यो ऑलिम्पिकसाठी जाणारा प्रत्येक निवड झालेला खेळाडू,संभाव्य खेळाडू, सहायक चमू आणि अधिकारी सर्वांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

 

जुलै महिन्यात, पंतप्रधान स्वतः दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऑलिम्पिक चमूशी संवाद साधतील. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संपूर्ण भारतीय अभिमानाने त्यांना शुभेच्छा देत आहेत, हे सांगण्यासाठी, पंतप्रधान हा संवाद साधतील.खेळ हा भारताच्या राष्ट्रीय चारित्र्याचा अविभाज्य घटक असून, आपले युवा देशात खेळाची एक भक्कम आणि गतिमान संस्कृती विकसित करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. १३५ कोटी भारतीयांच्या सदिच्छा कायमच आपल्या युवा खेळाडूंसोबत असतील. तसेच, जागतिक पटलावर कीर्ती गाजवणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूपासून, हजारो युवक-युवती क्रीडा क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडुंकडे विशेष लक्ष दिले जाईल तसेच, या स्पर्धेत सहभागी होतांना त्यांचे मनोबल कायम राहावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. यासाठीच स्पर्धाकाळातही, खेळाडू आणि त्यांच्या पालकांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, नियमित संवाद साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

एकूण ११ क्रीडा प्रकारातील १०० खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यासोबत,आणखी २५ खेळाडू जून 2021 च्या अखेरपर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. रिओ दि जानेरो इथे २०१६ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये १९ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. मात्र टोक्यो इथे होणाऱ्या पॅरालिम्पिकसाठी २६ खेळाडू याआधीच पात्र ठरले असून, आणखी १६ खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे.


Tags: prime minister narendra modiTokyo Olympicsटोक्यो ऑलिम्पिकपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐका “आनंदयात्री – पोलीस अधिकाऱ्याची डायरी”

Next Post

खेडमध्ये ठिणगी! पवारांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा राष्ट्रवादी आमदाराला आवाज!!

Next Post
sanjay raut (2)

खेडमध्ये ठिणगी! पवारांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा राष्ट्रवादी आमदाराला आवाज!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!