मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाण्यांची नवीन मालिका सादर केली. ही नाणीही ‘ब्लाइंड फ्रेंडली’ आहेत. याचा अर्थ असा की या नाण्यांमध्ये ब्रेल लिपीमध्ये देखील मूल्य चिन्हांकित केले आहे जेणेकरून दृष्टिहीनांना देखील ते ओळखता येईल. ही नाणी १ , २ , ५ , १० , २० रुपये मूल्यांची आहेत. या नाण्यांवर अमृत महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल – जन समर्थ पोर्टल लॉंच केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गेल्या काही वर्षांमध्ये अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने आपल्या कृतीतून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपला वारसा बनवला आहे, खूप मोठा प्रवास घडवून आणला आहे. तुम्ही सर्व या वारशाचा एक भाग आहात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “देशातील सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणे असो किंवा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे असो, गेल्या ७५ वर्षांत अनेक साथिदारांनी यात मोठे योगदान दिले आहे. ते म्हणाले की, ही नवीन नाणी देशवासीयांना अमृत महोत्सवी वर्षाची सतत आठवण करून देतील आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची प्रेरणा देतील.”
नाणे पाहता अमृत महोत्सवी वर्षाची आठवण होणार
अर्थ मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक वीक सेलिब्रेशन’ला संबोधित करताना मोदी म्हणाले, “नाण्यांची ही नवीन मालिका लोकांना ‘अमृत महोत्सवी’ वर्षाच्या ध्येयाची आठवण करून देईल आणि लोकांना देशाच्या विकासासाठी काम करण्यास प्रेरित करेल. यावेळी मोदींनी ‘जन समर्थ पोर्टल’ लाँच केले, जे १२ सरकारी योजनांचे क्रेडिट-लिंक पोर्टल आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, “या प्रत्येक योजना पोर्टलवर प्रदर्शित केल्या जातील. या पोर्टलमुळे सुविधा वाढतील आणि नागरिकांना सरकारी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी एकच प्रश्न विचारावा लागणार नाही.”
नव्या नाण्यांची आकर्षक रचना
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नाणी सादर केली, जी ब्लाइंड फ्रेंडली आहेत.
२. ही नाणी १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची आहेत.
३. या नाण्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची डिझाईन करण्यात आली आहे.
४. ही नाणी विशेष स्वरूपात जारी करण्यात आलेली नाही आहेत, परंतु सामान्य व्यवहारात चालू राहतील.