Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, लसीकरणाचा मुद्दा महत्वाचा

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
conference meeting

मुक्तपीठ टीम

देशातील कोरोनाचा वाढत्या रुग्ण संख्येच्या पाश्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक आहे. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. या बैठकीत देशभरातील कडक निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासारख्या कोरोनाचा उद्रेक झालेल्या राज्यांना व्यापक लसीकरणासाठी लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे.

बैठकीच्या आयोजनामागील परिस्थिती

• लसीकरण कव्हरेज आणि कोरोनाचे वाढते प्रमाण चिंतेचे विषय
• लसीकरणाबाबत लोकांच्या मनात असलेल्या संशयामुळे हा कार्यक्रम मंदावला आहे.
• देशातील वाढती रुग्णांची संख्या ही दुसर्‍या लाटेचे संकेत देत आहेत.

 

पंतप्रधान-मुख्यमंत्री बैठकीत पुढील निर्णयांची अपेक्षा

१. देशातील प्रत्येकाच्या लसीकरणाची परवानगी
१६ जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत ३.२९ कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. त्यासाठी वैद्यकीय केंद्रांची संख्याही वाढवत, आठवड्यातून सात दिवस लसीकरणास संमती मिळू शकते. उद्योगपती आनंद महिंद्रासारख्या मान्यवरांच्या सुचनेप्रमाणे कोरोना उद्रेक झालेल्या महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात प्रत्येकाच्या लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो.

२. कॉर्पोरेट कंपन्यांचा लसीकरणात सहभाग
अनलॉकनंतर अनेक कंपन्यानी आपले कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले. पण निर्बंधांमुळे संपूर्ण मनुष्यबळ वापरता येत नाही. त्याचा अर्थकारणावर दुष्परिणाम होऊ शकतो. सरकार कंपन्यांना त्यांच्या खर्चावर कर्मचार्‍यांना लस देण्याची परवानगी देऊ शकते. देशातील बड्या कंपन्यांनाही लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यास सांगितले जाऊ शकते. रिलायन्स, इन्फोसिस अशा काही कंपन्यांनी तसे करण्याचे जाहीर केले आहे.

३. सरकारी खर्चाने लसीकरण
सध्या शासकीय रुग्णालयात कोरोना लस विनामूल्य दिली जात आहे. यासाठी खासगी रुग्णालयात २५० रुपये घेतले जात आहेत. लसीचा खर्च राज्यांबरोबर वाटत लसीकरण सर्वांसाठी विनामूल्य केले जाऊ शकते.
लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने उचलावा अशीही शक्यता आहे. यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी राज्यांना दिली जाऊ शकते.

४. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि नवीन निर्बंध
आरोग्य मंत्रालयानेह महाराष्ट्रात कोरोना उद्रेकामागे लोकांचा निष्काळजीपणा हे महत्वाचे कारण सांगितले आहे.
कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर आणि लसीकरणानंतर लोकांमधील भीती कमी झाली.
नियम शिथिल झाल्याने कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा सरकार कडक निर्बंधाबाबत निर्णय घेऊ शकेल.

५) निवडणूक प्रचारासाठी कडक निर्बंध
बर्‍याच राज्यात निवडणुका होत आहेत. निवडणुकांच्या गर्दीच्या कार्यक्रमांवरही सरकार काही नियम बनवू शकते.


Tags: coronacorona vaccinationMaharashtraPM Narendra modiVideo Conferenceपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

भाजपा खासदाराचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू

Next Post

“महाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत”

Next Post
RAJESH TOPE

"महाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!