मुक्तपीठ टीम
नेहमीच साधेपणासाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकूण किती संपत्ती असेल हे जाणून घेण्याची अनेकांनाच इच्छा आहे. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची संपत्ती किती याची माहिती जाहीर केली आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती २ कोटी २३ लाख रुपये असल्याचे यात जाहीर करण्यात आलेले आहे. या पैकी बहुतांश संपत्ती ही बँक डिपॉझिटच्या स्वरुपात आहे. त्यांच्या या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचा समावेश नाही कारण त्यांनी गुजरातच्या गांधीनगरमधली जमीन दान केली.
पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत २६.१३ लाख रुपयांची वाढ !!
- पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही.
- परंतु त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत १.७३ लाख रुपये आहे.
- मोदींच्या जंगम मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत २६.१३ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
- ३१ मार्च २०२२ पर्यंत, मोदींकडे एकूण २,२३, ८२,५०४ मालमत्ता आहे.
- पंतप्रधानांकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण ३५,२५० रुपये रोख रक्कम आहे.
- तसेच पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या नावे ९,०५,१०५ रुपये डिपॉझिट आहेत.
- तसेत मोदींकडे १,८९,३०५ रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी आहे.
२०२१मध्ये १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता!!
- मागच्या वर्षी त्यांच्याकडे १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना गांधीनगरमध्ये एक जमीन खरेदी केली होती. त्यामध्ये त्यांच्यासोबत इतर तीन हिस्सेदार होते. जमिनीपैकी २५ टक्क्यांवर मोदींचा अधिकार होता.
- ती जमीन त्यांनी दान केली आहे.
२९ केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली!!
- पंतप्रधान मोदींसमेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही संपत्ती जाहीर केली आहे.
- सिंह यांच्याकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत २.५४ कोटी रुपये आणि २.९७ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
- धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य शिंदे, आरके सिंह, हरदीप सिंह पुरी, पुरषोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांच्यासह इतर २९ केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.
- माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही गेल्या आर्थिक वर्षातील संपत्ती जाहीर केली आहे. जुलैमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.