मुक्तपीठ टीम
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या दूरसंचार ऑपरेटर त्यांच्या 5G सेवा भारतात सुरु करण्यासाठी सज्ज आहेत. आता पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 5G सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान १ ऑक्टोबर २०२२ रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये नवीन पिढीतील इंटरनेट ५G सेवा सुरू करणार आहेत.
नॅशनल ब्रॉडबँड मिशनने एक ट्विट शेअर केले होते, जे आता हटवण्यात आले आहे. ट्विटमध्ये असे लिहिले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस, आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शनात 5G सेवा सादर करतील.
इंडिया मोबाइल काँग्रेस वेबसाइटने शेअर केला पोस्टर…
इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) च्या अधिकृत वेबसाइटवर असे सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग असतील. दूरसंचार विभाग, दळणवळण मंत्रालय आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) हे सर्व या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सेवांचे अधिकृत प्रक्षेपण १ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.
जिओ युजर्सना 5G चा लाभ कधी मिळणार?
- रिलायन्स जिओने पुष्टी केली आहे की २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सणापासून भारतात 5G सेवा सुरू होईल.
- कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) २०२२ मध्ये स्पष्ट केले की सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला 5G चा लाभ मिळेल.
- कंपनीने पुढील वर्षापर्यंत सर्व Jio युजर्सना 5G सेवा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एअरटेल या महिन्याच्या अखेरीस लाँच करणार ५G!…
- एअरटेलची 5G सेवा या महिन्याच्या शेवटी सुरू होईल.
- एअरटेलची 5G सेवा डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल.
- एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी स्पष्ट केले की यानंतर देशभरात रोलआउट सुरू होईल आणि पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा मार्च २०२५ पर्यंत सर्व युजर्सना याचा लाभ मिळेल.