मुक्तपीठ टीम
गुरुवारी चार राज्यात भाजपाला भरघोस यश मिळाले. या यशानंतर पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील मविआ सरकारसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, काही लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थांना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत असल्याचे त्यांनी म्हटले.
या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही!
- आपल्या देशात भ्रष्ट्राचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे.
- देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे.
- भाजपाने २०१४ प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती.
- आमचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने २०१९ मध्ये आणखी आशीर्वाद दिला.
- भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे.
- पण तटस्थ असलेल्या संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात तर हे लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत.
- घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत.
- तपास यंत्रणांना थांबण्यासाठी हे लोक नवीन मार्ग शोधत आहेत.
- या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणला जातोय!
- आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत.
- तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो.
- ही या लोकांची प्रवृत्ती आहे.
- हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात.
- कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात.
- मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा.
- तर हे पंथ मजबूत होतील, समाज मजबूत होईल.