मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य प्रयत्न केले तर आपण नक्कीच विजय मिळू शकतो, असं मोदी यावेळी म्हणाले.
त्यांनी तरुणांना विनंती केली की, त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोरोना नियम लागू करण्यासाठी मदत करावी. तुम्ही तसं केलंत तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. तसेच राज्यांनीही लॉकडाऊनला अंतिम पर्याय मानावे, असेही त्यांनी सांगितले.
- सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक केलं.
- देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ऑक्सिजनची निर्मिती करण्यावरही प्रयत्न केले जात आहेत.
- देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे.
- जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे.
- यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत.
- त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे.
- या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली.
- यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले.
- देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं कौतुक.
“यावेळी तरुणांना विनंती केली की, त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोरोना नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असं पंतप्रधान म्हणाले.