Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत काहीसा दिलासा…तीन दिवस नवी रुग्णसंख्या घटतेय!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Mumbai 20-4-21

मुक्तपीठ टीम

कोरोना संसर्ग सर्वत्र उफाळत असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या संख्येत काहीशी घट होत आहे. कोरोना मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आशेची किरणं जाणवत आहेत. आकडेवारीत फार मोठा बदल झाला नसेल, परंतु गेल्या काही दिवसांत सतत वाढत असलेल्या संसर्गाची गती मंदावल्याचे आढळत आहे.

 

मुंबईत तीन दिवस, घटते नवे रुग्ण

  • १८ एप्रिल – ८४६८
  • १९ एप्रिल – ७३८१
  • २० एप्रिल – ७१९२

 

मुंबईत गेल्या २४ तासांत ७१९२ रुग्ण आढळले तर ३५ लोकांचा मृत्यू झाला. सोमवारी ७,३८१ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले तर ५७ लोक मरण पावले.

 

मुंबईत कशी लढतेय कोरोनाशी?

  • सध्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढत आहे.
  • सक्रिय रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे.
  • गेल्या २४ तासांत ९,६४१ लोक बरे होऊन घरी परतले आहेत.
  • देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण फक्त ०.०३ टक्के आहे.
  • मास्क घालणे, नियमांची कडक अंमलबजावणी आणि इतर उपक्रमांमुळे मृत्यूची संख्या कमी करण्यात मदत झाली आहे.
  • फेब्रुवारीच्या मध्यात दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शहरात गेल्या ७० दिवसांत ९५३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार दुसर्‍या लाटेत २.६६ लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
  • मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरि पेडणेकरांच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या अनेक जागरूकता करणाऱ्या मोहिमेमुळे आणि नियमांची बऱ्यापैकी काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने मृत्यू टाळण्यास मदत होत आहे.

Tags: coronaMaharashtramumbaiकोरोनामहाराष्ट्रमुंबई
Previous Post

“अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून”

Next Post

पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद, राज्यांनी लॉकडाऊन टाळावा!

Next Post
narendra modi

पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद, राज्यांनी लॉकडाऊन टाळावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!