मुक्तपीठ टीम
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे केंद्र सरकार आता सतर्क झाली आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी प्रेझेंटेशन दिले. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदींसोबत पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत.
दिल्लीत मास्क सक्ती, महाराष्ट्रातही शक्यता!
- देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या हजारावर गेली आहे. त्यामुळे तेथे मास्क सक्ती सुरु झाली आहे. आता महाराष्ट्रातही तसं होण्याची शक्यता आहे.
- गुढी पाडव्याच्या दिवशी राज्य सरकारने महाराष्ट्रात मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र राज्यात कोरोनाचा शिरकाव वाढू लागल्याने आता पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात राज्यात १५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण
२० एप्रिल – १६२
२१ – १७९
२२ – १२१
२३ – १९४
२४ – १४४
२५ – ८४
२६ – १५३
देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण
२० एप्रिल – २०६७
२१ – २३८०
२२ – २४५१
२३ – २५२७
२४ – २५९३
२५ – २५४१
२६ – २९२७