मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २ दिवसीय बांगलादेश दौऱ्यादरम्यान ‘एअर इंडिया वन’चं विमान बी -७७७ चर्चेत आलं आहे. कोरोना संकटानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त, प्रचंड क्षमता असलेल्या या विमानाची तुलना एअरफोर्स वनशी केली जात आहे. सर्वात सुरक्षित आणि आरामदायी अशी या विमानाची वैशिष्ट्य आहेत.
काय आहे एअर इंडिया वनची वैशिष्ट्य
- – अमेरिकन बोईंग कंपनीने बी-७७७ ची निर्मिती केली आहे.
- – विशेष मागणीनुसार विमानाची निर्मिती
- – सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा या विमानाने प्रवास
- – विमानाचा वेग ताशी ९०० किमी आहे.
- – हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.
- – विमानाच्या दुसऱ्या भागात जॅमर बसवण्यात आले आहेत. यामुळे शत्रूच्या रडारचे सिग्नल जॅम होतात.
- – विमानात कार्यालय आणि कॉन्फरन्स रुम तसंच प्रयोगशाळेची सुविधा
- – विमानात दुहेरी GE90-115 इंजिन
- – करारानुसार, हे विमान जुलै २०२० मध्ये एअर इंडियाला सुपूर्त केलं जाणार होतं. मात्र कोरोना संकटामुळे या प्रक्रियेला उशीर झाला.
- – याच विमानाला व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या दृष्टीकोनातून पुनर्निमितीसाठी अमेरिकेच्या डलासमध्ये पाठवण्यात आलं.
- – हे विमान सुरक्षित आणि अभेद्य आहे.
- – शत्रूच्या हल्लयाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे विमान पूर्णपणे सक्षम आहे.
- – उड्डाणादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता आहे.
- – बी -७७७ विमान अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेनं सज्ज आहे.
- – विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.
- – कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती देण्यासाठी विमानात सेन्सर्स बसवण्यात आलेत.
- – लार्ज एअरक्राफ्ट काउंटरमेजर्स म्हणजेच (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्शन सूट म्हणजेच (एसपीएस) देखील आहेत. या संरक्षण यंत्रणेला १९ कोटी डॉलर्सच्या किंमतीवर विकायला अमेरिकेने ग्रीन सिग्नल दिला.