Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

 आंदोलनाचा जोर ओसरला पण संताप धगधगताच…त्यामुळेच भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narang

मुक्तपीठ टीम

मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा प्रतिसाद कमी झालेला असला तरी शेतकरी आंदोलकांच्या मनातील संताप धगधगताच असल्याचे दिसून येत आहे. या संतापातून कृषी कायद्याचा विरोध करणारे काही शेतकरी आता कायदे हातात घेऊ लागले आहेत.
कृषी कायद्यांबदद्ल भूमिका मांडण्यासाठी आलेल्या भाजपाच्या एका आमदाराला शेतकरी आंदोलकांनी नुकतीच केलेली मारहाण त्या संतापाचेच निदर्शक मानली जात आहे.

शेतकऱ्यांनी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये भाजप आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेत अरुण नारंग यांचे कपडे फाटले असून, त्यांना दुखापतही झाली आहे. अरुण नारंग अबोहरचे आमदार आहेत.

शेतकऱ्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड

अरुण नारंग कृषी कायद्याच्या समर्थनार्थ एक पत्रकार परिषद घेण्यासाठी मलोटला आले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या येण्याची बातमी कळताच शेकडो शेतकरी मलोटमधील भाजप कार्यालयाच्या बाहेर जमा झाले. शेतकरी जमा होताना दिसताच पोलिसांनी अरुण नारंग यांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हातून अरुण नारंग यांना खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यानंतर पोलिसांनी कसेबसे नारंग यांना एका दुकानात नेले. यानंतर शेतकऱ्यांनी त्या दुकानाबाहेर घोषणाबाजी करत नारंग यांच्या गाडीची तोडफोड केली.

थोड्या वेळाने पोलिसांनी नारंग यांना दुकानातून बाहेर काढले. शेतकरीही त्यांच्यामागे धावले. हे पाहून आमदार आणि नेते आपला जीव वाचवण्यासाठी वेगात धावू लागले. पोलिसांनी चिडलेल्या शेतकर्‍यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरू झाला. दरम्यान, शेतकर्‍यांनी आमदाराला पकडले आणि त्यांची मारहाण करत कपडे फाडले. त्यानंतर कशी तरी पोलिसांनी आमदाराची सुटका करून घेतली व ते आपल्यासमवेत घेऊन गेले.

 

मुख्यमंत्र्यांकडून निषेध

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आमदार नारंग यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. अशा प्रकारे कायदा हाती घेण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.


Tags: farmer lawmodi sarkarअरुण नारंगकृषी कायदामुख्यमंत्री अमरिंदर सिंहमोदी सरकार
Previous Post

सामनाचा ‘रोख’ कुणाला ‘ठोक’णारा? “वाझेसारख्या सामान्य फौजदाराचे महत्व का वाढले?”

Next Post

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ‘एअरफोर्स वन’ला टक्कर देणारं मोदींचं विमान! जाणून घ्या वैशिष्ट्य…

Next Post
pm modi aircraft

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या 'एअरफोर्स वन'ला टक्कर देणारं मोदींचं विमान! जाणून घ्या वैशिष्ट्य...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!