Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबईतील प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी ऐरोलीत भूखंड

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
subhash desai

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता ऐरोलीतील एक भूखंड देण्यात आला आहे. मंगळवारी या भूखंडाचे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहसचिव मिलिंद गवादे, एस. एस. पाटील, अनिल पवार, बी. डी. राठोड, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे उपस्थित होते.

subhash desai

“मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत ही बहुउद्देशीय सामाईक सुविधांनी युक्त असणार आहे. या इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुउद्देशीय सभागृह यांसह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असणार आहे”, अशी माहिती सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग यांनी याप्रसंगी दिली.

 

मराठी भाषा विकास व संवर्धनाकरिता कार्यरत असणाऱ्या भाषा संचलनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था, या संस्थांची कार्यालये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून त्यामध्ये एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने २०१६ मध्ये सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली होती. त्यानुसार, सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर-१३ मधील भूखंड क्र. ६अ हा अंदाजे ३०००चौ.मी. चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन, दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आला.

subhash desai

त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे अशी माहिती सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग यांनी दिली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: CIDCOMaharashtrasubhash desaiऐरोलीनवी मुंबईमराठी भाषा भवनसिडको महामंडळसुभाष देसाई
Previous Post

दोन्ही लाटांमध्ये कोरोनाला सीमेबाहेरच रोखणारे ठाण्याचं सीमेवरील गाव

Next Post

मैत्री थाई प्रोजेक्टची थायलंडमधून भारतात ३१ रुग्णवाहिकांची मदत

Next Post
ambulances

मैत्री थाई प्रोजेक्टची थायलंडमधून भारतात ३१ रुग्णवाहिकांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!