Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला सक्षमीकरणासाठी ग्लोबल पाऊल! महाराष्ट्रात ऑस्ट्रेलियाच्या सहकार्यानं पायलट प्रोजेक्ट!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
PILOT project

मुक्तपीठ टीम

महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना गती देण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरणासाठी राबवायच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास आणि महिला व बाल विकास विभागातील अधिकारी यांच्या समवेत आज बैठक झाली.

या बैठकीत नागरी भागातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण, बालकांची काळजी घेण्याऱ्या संस्थांना मदत, सामाजिक दायित्व निधीतून देण्यात येणारी मदत, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटातील महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अनाथ बालकांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत याबाबत परस्पर सहकार्य करण्याबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती श्रध्दा जोशी, उपसचिव विलास ठाकूर, तसनिम वाहनवटी आदि उपस्थित होते.

मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिला व बाल विकास विभागाने प्रतिपालकत्व नोंदणी पोर्टल सुरू केले आहे, हे निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी मदत होणार आहे. महिलांमध्ये उद्योजकीय विकास, रोजगाराच्या संधी, बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ काम करते. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचतगटाच्या महिलांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य आपल्याला घेता येईल.

महिलांचा विकास आणि सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना गती देण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पथदर्शी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी यासंदर्भातील बैठकीत दिली. pic.twitter.com/cAb1D63DHc

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 27, 2022


नकळत वाट चुकून गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या बालकांचे संनियंत्रण व त्यांची देखरेख करणे सोपे व्हावे यासाठी ‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी मंत्री ॲड.ठाकूर यांनी दिली. नागरी भागात कुपोषित मुले आढळून आली आहेत यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागात नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील निराधार, निराश्रित, अनाथ, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला तसेच अनाथ आणि काळजी संरक्षणाची गरज असलेली बालके, स्तनदा माता, किशोरवयीन मुले या सर्व घटकांची विशेष काळजी राज्य शासनाच्यावतीने घेतली जाते, असेही मंत्री ॲड.ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिलांचे सक्षमीकरणाच्या योजनांसाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल. याबाबत आपण मसूदा तयार करून परपस्पर सहकार्याने काम करू.


Tags: good newsMaharashtra-Australian ConsulatemuktpeethPILOT projectWomen and Child Welfare Minister Adv. Yashomati Thakurwomen empowermentचांगली बातमीपायलट प्रोजेक्टमहाराष्ट्र-ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासमहिला बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूरमहिला सक्षमीकरणमुक्तपीठ
Previous Post

‘सूर्यदत्त’ला सलग दुसऱ्या वर्षी ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर

Next Post

ऑगस्टमध्ये चंद्रावर स्वारी!

Next Post
ऑगस्टमध्ये चंद्रावर स्वारी!

ऑगस्टमध्ये चंद्रावर स्वारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!