Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लुडो खेळाविरोधात न्यायालयात याचिका, कौशल्याचा नाही भाग्याचा खेळ! जुगाराचा आरोप!

मनसे नेत्याची लुडोविरोधात याचिका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ludo

मुक्तपीठ टीम

लूडोला कौशल्याचा नव्हे तर भाग्याचं खेळ म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केशव मुळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोक लुडो सुप्रीम अ‍ॅपवर पैशाने खेळत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली आहे. न्यायालयाने तातडीच्या सुनावमीचे कारण विचारले असता, याचिकाकर्त्यांचे वकील निखिल मेंगड़े यांनी लुडोच्या नावावर जुगार खेळला जात असल्याने एकंदर समाजावर, तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहेत, त्यामुळे तात्काळ सुनावणीची आवश्यकता आहे. त्यानुसार न्यायालयाने सरकारला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.

 

लुडो ॲपवर जुगाराचा आरोप

  • याचिकेनुसार लुडो सुप्रीम अ‍ॅपवर पैसे लावून खेळणे हा गैरप्रकार आहे.
  • गार निषेध कायद्याच्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा आहे.
  • त्यामुळे अ‍ॅपशी संबंधित लोकांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.
  • या खेळामध्ये ४ लोकं ५-५ रुपये पणाला लावून खेळतात.
  • जिंकणार्‍याला १७ रुपये मिळतात आणि ॲप चालवणार्‍याला ३ रुपये मिळतात.
  • याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका मांडण्यास सांगितले आहे. याचिकेवर २२ जून २०२१ला सुनावणी होणार आहे.

 

लुडो कौशल्याचा नाही, तर भाग्याचा खेळ!

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केशव मुळे यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
  • लूडो हा खेळ त्याचा फासा टाकल्या नंतर त्यावर येणाऱ्या अंकांनुसार खेळला जातो.
  • त्यामुळे लुडो हा खेळ कौशल्य नाही तर भाग्याचा खेळ आहे.
  • तो खेळताना जर या खेळामध्ये लोकांनी काही पणाला लावले तर हा खेळ जुगाराचे रूप घेतो.
  • सध्या ॲपवर खेळला जात असल्याने त्याचा मोठा प्रचार प्रसार होत आहे.
  • तरुण त्याच्याकडे आकर्षिले जात आहेत, त्यामुळे समाजावर वाईट परिणाम होत आहे.
  • याविरोधात आधी पोलीस ठाणे, त्यानंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली गेली. पण त्या न्यायालयाने लुडो हा कौशल्याचा खेळ मानला.
  • त्यामुळेच मुळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

Tags: ludomumbai high courtमुंबई उच्च न्यायालयलुडो
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

शिवरायांच्या कर्तृत्वाची दहा वैशिष्ट्ये

Next Post
शिवरायांच्या कर्तृत्वाची दहा वैशिष्ट्ये

शिवरायांच्या कर्तृत्वाची दहा वैशिष्ट्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!