मुक्तपीठ टीम
लूडोला कौशल्याचा नव्हे तर भाग्याचं खेळ म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केशव मुळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोक लुडो सुप्रीम अॅपवर पैशाने खेळत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली आहे. न्यायालयाने तातडीच्या सुनावमीचे कारण विचारले असता, याचिकाकर्त्यांचे वकील निखिल मेंगड़े यांनी लुडोच्या नावावर जुगार खेळला जात असल्याने एकंदर समाजावर, तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहेत, त्यामुळे तात्काळ सुनावणीची आवश्यकता आहे. त्यानुसार न्यायालयाने सरकारला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
लुडो ॲपवर जुगाराचा आरोप
- याचिकेनुसार लुडो सुप्रीम अॅपवर पैसे लावून खेळणे हा गैरप्रकार आहे.
- गार निषेध कायद्याच्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा आहे.
- त्यामुळे अॅपशी संबंधित लोकांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.
- या खेळामध्ये ४ लोकं ५-५ रुपये पणाला लावून खेळतात.
- जिंकणार्याला १७ रुपये मिळतात आणि ॲप चालवणार्याला ३ रुपये मिळतात.
- याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका मांडण्यास सांगितले आहे. याचिकेवर २२ जून २०२१ला सुनावणी होणार आहे.
लुडो कौशल्याचा नाही, तर भाग्याचा खेळ!
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केशव मुळे यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
- लूडो हा खेळ त्याचा फासा टाकल्या नंतर त्यावर येणाऱ्या अंकांनुसार खेळला जातो.
- त्यामुळे लुडो हा खेळ कौशल्य नाही तर भाग्याचा खेळ आहे.
- तो खेळताना जर या खेळामध्ये लोकांनी काही पणाला लावले तर हा खेळ जुगाराचे रूप घेतो.
- सध्या ॲपवर खेळला जात असल्याने त्याचा मोठा प्रचार प्रसार होत आहे.
- तरुण त्याच्याकडे आकर्षिले जात आहेत, त्यामुळे समाजावर वाईट परिणाम होत आहे.
- याविरोधात आधी पोलीस ठाणे, त्यानंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली गेली. पण त्या न्यायालयाने लुडो हा कौशल्याचा खेळ मानला.
- त्यामुळेच मुळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.