मुक्तपीठ टीम
देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी भारताला चौथी कोरोना लस मिळू शकेल. अमेरिकेतील ही कोरोना लस उत्पादक कंपनी भारताच्या संपर्कात आहे. सध्या फायझरची कोरोना लस भारतात मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहे. बर्याच तज्ज्ञांच्या मते फायझरची लसही कोरोना संसर्गाविरोधात प्रभावी ठरली आहे. या लसीमध्ये कोरोना संसर्गाविरूद्धच्या सर्व चाचण्यांमध्ये ९२ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत कार्यक्षमता दिसून आली. बीएनटी-१६२-बी-२ असे या लसीचे नाव आहेय या लसीला डब्ल्यूएचओने प्रभावी आणि सुरक्षित कोरोना लसींच्या यादीतही समाविष्ट केले आहे.
भारतातील कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाशी सामना करताना सरकारही लसीला कोरोनाशी सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन सध्या भारतात उपलब्ध आहेत. रशियाच्या स्पुतनिक व्हीला आपत्कालीन मंजुरीनंतर भारतात आली आहे. १ मेपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयासाठी लसीकरण सुरू झाले आहे, मात्र, पुरेशा लसींअभावी ते रखडत आहे.
भारतात लस उपलब्ध करुन देताना फायझरने त्यांची लस ही फक्त सरकारी कराराद्वारे दिली जाईल, असं म्हटले आहे. याचा अर्थ असा की, ही लस देशातील खासगी रुग्णालयात मिळणार नाही. सरकारने जर पुरवली तरच ती तेथे मिळू शकेल. कोरोनाच्या साथीच्या या टप्प्यात फायझर सरकारी लसीकरण कार्यक्रमांना प्राधान्य देणार आहे.
पाहा व्हिडीओ: