मुक्तपीठ टीम
सतत २४ दिवस पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झाला नव्हता. सातत्यानं होणारी दरवाढ निवडणुकांमुळे थांबली अशी चर्चाही रंगू लागली आणि आज तर आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आली आहे. आज इंधन कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर काहीसे का असेना पण घटले आहेत.
आज जाहीर झालेल्या नव्या दरांनुसार मुंबईत पेट्रोल आता ९७ रुपये ४० पैसे आणि डिझेल ८८ रुपये ४२ पैसे प्रती लीटर असेल.
आंतरराष्ट्रीय दर घटल्याचे कारण
पेट्रोल डिझेल दरकपातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर घटल्याचे कारण दिले जात आहे. पण अनेकदा त्या बाजारात दर वाढले नसतानाही ग्राहकांवर मात्र दरवाढ लादली जात होती, असा जाणकारांचा आक्षेप असतो. आताही आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १५ दिवसांमध्ये कच्च्या इंधनाचे दर १० टक्क्यांपर्यंत घटले आहेत. तरीही भारतीय ग्राहकांना त्याचा फायदा देण्यात आला नाही. तो आज पहल्यांदा किरकोळ स्वरुपात मिळाला आहे.
रोज सकाळी ६ वाजता ठरतात इंधन दर
- रोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर ठरतात
- पेट्रोल आणि डिझेलच्या बदललेल्या दराची माहिती ऑनलाइन तसेच एसएमएसद्वारेही उपलब्ध असते.
- पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात अबकारी कर, वितरक कमिशन, आणि अन्य कर जोडल्यानंतर ग्राहकांसाठीचा महागडा दर पुढे येतो.