Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सात मार्चनंतर इंधन दरवाढीची आफत! भाजपाची निवडणूक गरज संपताच इंधन भडकणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Petrol diesel

मुक्तपीठ टीम

रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतावरही परिणाम होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान गेल्या चार महिन्यांपासून स्थिर ठेवण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

निवडणूक काळात केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात असंतोष भडकू नये, यासाठी निवडणूक कालावधीत इंधन दर जसे असतात तसे ठेवण्यात येतात. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाशी स्थानिक इंधन दरांची घालण्यात आलेली सांगड ऑइल कंपन्याही विसरून जातात. मात्र, निवडणुकांची गरज भागताच पुन्हा सर्व घट भरून काढण्यासाठी मोठी दरवाढ केली जाते. आताही तशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले की, गेल्या दोन महिन्यांत जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारी तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. देशांतर्गत तेल कंपन्यांना केवळ खर्च भरून काढण्यासाठी लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर किमान १२ रुपयांनी वाढवाव्या लागतील. तेल कंपन्यांसाठी मार्जिन समाविष्ट केल्यानंतर किंमती १५ रुपयांनी वाढवण्याची गरज आहे.

 

भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींचा प्रभाव पडतो.

 

…तर मार्जिन १०.१ रुपयांनी खाली येऊ शकते

  • तसेच ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात संपतील.
  • त्यानंतर दररोज इंधनाचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे.
  • अहवालानुसार, ३ मार्च २०२२ रोजी वाहन इंधनाचे विपणन नफा उणे ४.९२ रुपये प्रति लिटर इतके होते.
  • चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आतापर्यंत ते १.६१ रुपये प्रति लिटर आहे.
  • इंधनाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर, निव्वळ नफा १६ मार्च रोजी उणे १०.१ रुपये प्रति लिटर आणि १ एप्रिल रोजी १२.६ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकते.

 

नऊ वर्षात पहिल्यांदाच कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या

  • आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी नऊ वर्षांत पहिल्यांदाच १२० डॉलर प्रति बॅरलच्या वर वाढल्या.
  • शुक्रवारी १११ डॉलरवर किंचित कमी झाल्या, पण किंमत आणि किरकोळ दरांमधील अंतर वाढले आहे.
  • पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (पीपीएसी) कडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी भारतातील कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल ११७.३९ डॉलरपर्यंत वाढली, जी २०१२ नंतरची सर्वाधिक आहे.
  • तर नोव्हेंबर २०२१ च्या सुरुवातीला कच्च्या तेलाची भारतीय बास्केट किंमत प्रति बॅरल सरासरी ८१.५ डॉलर होती.

Tags: Crude oilIndiaPetrol diesel pricerussia ukrain warकच्च तेलपेट्रोल- डिझेल दरवाढभारतरशिया-युक्रेन युद्ध
Previous Post

शिक्षण अधिकार कायद्याचे मोठ्या शाळांकडून उल्लंघन! शिक्षण अधिकाऱ्यांकडून कारवाई नसल्याची तक्रार!!

Next Post

आयोगाचे अधिकार सरकारकडे घेवून ओबीसी आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात टिकणार?

Next Post
Mantralaya and SC

आयोगाचे अधिकार सरकारकडे घेवून ओबीसी आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात टिकणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!