मुक्तपीठ टीम
राजकीय पक्षांकडून होत असलेल्या धार्मिक प्रतिकांचा वापर हा बेकायदेशीर असतो. पण तरीही तसं केलं जातं. आता तसं करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात धार्मिक नावे आणि चिन्हे वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. राजकीय पक्षांनी धार्मिक नावे आणि चिन्हे वापरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटीसद्वारे निवडणूक आयोगाला आणि केंद्राला नोटीस बजावत जाब विचारला आहे. ही याचिका वसीम रिझवी यांनी दाखल केली आहे.
राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यास बंदी
- सर्वोच्च न्यायालयाने सय्यद वसीम रिझवी यांच्या याचिकेवर आज सुनावणी केली.
- राजकीय पक्षांवर बंदी घालण्याची मागणी रिझवी यांनी केली आहे.
- धार्मिक नावे आणि चिन्हे वापरणाऱ्या पक्षांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशीही मागणी याचिकेत त्यांनी केली आहे.
पुढील सुनावणी १८ ऑक्टोबरला…
- सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करत निवडणूक आयोगासह केंद्र सरकारला नोटीस बजावली.
- न्यायालयाने दोघांकडून उत्तरे मागवली आहेत.
- या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ ऑक्टोबरला होणार आहे.
- केंद्र आणि निवडणूक आयोगाला चार आठवड्यात उत्तर दाखल करावे लागणार आहे.
- राजकीय पक्षांच्या झेंड्यांमध्ये चंद्र तारेचा वापर केला जात होता.
- सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला राजकीय पक्षांना पक्षकार बनवण्याची परवानगी दिली आहे.
- वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू मांडत प्रशन विचारला की , राजकीय पक्ष धार्मिक नावांचा वापर करू शकतात का?