मुक्तपीठ टीम
नेहमी प्रत्यक्ष कर वसुलीमध्ये कंपन्यांच्या कॉर्पोरेट कराचा वाटा जास्त असतो, असा अनुभव आहे. परंतु २१ वर्षांत प्रथमच प्रत्यक्ष करात कंपन्यांच्या तुलनेत सर्वसामान्यांचा वाटा वाढला आहे.
२०२०-२१मध्ये वैयक्तिक आयकर संकलन जास्त!’
• सन २०२०-२१ आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन ९.४५ लाख कोटी रुपये झाले आहे.
• यामध्ये कॉर्पोरेट कर संकलन ४.५७ लाख कोटी रुपये झाले आहे.
• वैयक्तिक आयकर संकलन ४.६९ लाख कोटी आणि इतर कर १६,९२७ कोटी आहे. यापूर्वीची आकडेवारी पाहिल्यास असे दिसून आले आहे की, करामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राचा वाटा जास्त होता.
कर संकलनातील ठळक मुद्दे
• २०००-०१ पासून ते २०१९-२० पर्यंत या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कराच्या तुलनेत सर्वसामान्यांचा कर सहभाग कमी होता.
• २०२०-२१ मध्ये हे प्रथमच घडले आहे, जेव्हा कॉर्पोरेट कर वसुली ४.५७ लाख कोटी झाली आहे. आयकर संकलन ४,६९ लाख कोटी आहे.
• २०१४ मध्ये जेव्हा मोदी सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा, कॉर्पोरेट कर ४.२८ लाख कोटी होता, तर आयकर फक्त २.६५ लाख कोटी रुपये होते.
• आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये कॉर्पोरेट कर ६.७८ लाख कोटी आणि आयकर ५.५५ लाख कोटी होते.
• २०२०-२१ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कर ४.५७ लाख कोटी असून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आयकर ४.६९ लाख कोटी आहे.
• याचा एक अर्थ असाही काढला जातो की कोरोना लॉकडाऊनमुळेही कॉर्पोरेट कर भरणा कमी झाला असावा.