Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोलापुरात लोकवर्गणीतून बदललं शाळांचं रंगरुप, अधिकाऱ्यांचा पुढाकार, लोकांचा सहभाग!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
solapur school

मुक्तपीठ टीम 

जर गावं एकवटलं तर सरकारपेक्षाही मोठं काम सहजच होतं. सोलापूर जिल्ह्यात लोकांनी सव्वा पाच कोटी रुपये लोकवर्गणी जमवली आणि पाहता पाहता शाळांचं रंगरुपच बदललं.

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं आपण नेहमीच ऐकतो. पण एखादा अधिकारी जर सकारात्मक असेल तर पैसा असो नसो, ते काही थांबत नाहीत. उलट समाजाला सोबत घेत ते अशक्य ते शक्य करुन दाखवतात. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत सव्वा पाच कोटी लोकवर्गणीतून अडीच हजार शाळांच्या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. आता मंत्रालयातूनही या उपक्रमाची दखल घेण्यात आल्याने सोलापूर पॅटर्न राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाच कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून अडीच हजार शाळा सुंदर झाल्या आहेत.यातून शाळांची रंगरंगोटी , बाग बगीचा , सीसीटीव्ही , संगणक , चित्रकलाकृती असं काम झाला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यात राबवलेल्या ‘स्वच्छ शाळा , सुंदर शाळे’च्या उपक्रमाची राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली आहे.अत्यंत चांगला हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबवणे योग्य असून जिल्हा परिषदेच्या सीईओ नी या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मुंबईत यावे असे निमंत्रण त्यांनी दिले आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड , शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेने या ऑनलाईन संवादात स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभिनयाची माहिती शिक्षण मंत्र्यांसमोर सादर केलीय. या उपक्रमातून शाळांचा झालेला कायापालट पाहून शिक्षण मंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या कामाचं कौतुक करून या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण सीईओ यांना दिला आहे. हा सोलापूर पॅटर्न भविष्यात राज्यात व राज्याबाहेर सर्वत्र लागू होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलाय.


Tags: Schoolsolapursolapur jilha parishadvarsha gaikwadवर्षा गायकवाडशाळासोलापूरसोलापूर जिल्हा परिषद
Previous Post

राज्यात १४१८ नवे रुग्ण, २,११२ रुग्ण बरे! विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये फक्त ७ नवे रुग्ण!!

Next Post

भगवान बुद्धांच्या जीवनातील पवित्र स्थानांचं दर्शन, महाराष्ट्रातून सुरु होणार अध्यात्मिक खास ट्रेन!

Next Post
irctc

भगवान बुद्धांच्या जीवनातील पवित्र स्थानांचं दर्शन, महाराष्ट्रातून सुरु होणार अध्यात्मिक खास ट्रेन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!