Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता जम्मू-काश्मिरात इतर राज्यातील भारतीयांनाही मतदानाचा अधिकार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
people of other states will be able to vote in jammu and kashmir

मुक्तपीठ टीम

जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) हिरदेश कुमार यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. आयोगाने काश्मीरबाहेरील म्हणजेच इतर राज्यातील भारतीयांनाही मतदानाचा अधिकार दिला आहे. यामध्ये सामान्यतः जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे कर्मचारी, विद्यार्थी, मजूर किंवा देशातील इतर राज्यांतील व्यक्तींचा समावेश असेल. ते त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करू शकता.

कोण करू शकतात मतदान?

  • बाहेरील लोकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अधिवासाची आवश्यकता नाहीय.
  • जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले इतर राज्यांतील सशस्त्र दलाचे कर्मचारीही मतदार यादीत आपली नावं समाविष्ट करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
  • स्थानिक नसलेल्यांना मतदान करण्यास प्रतिबंध नसल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
  • जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणी किती काळ राहतो हे महत्त्वाचं नाही.
  • जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नसलेले लोक राहतात की नाही याचा अंतिम निर्णय ईआरओ घेईल.
  • इथं भाड्यानं राहणारेही मतदान करू शकतात.

२० ते २५ लाख मतदार वाढण्याची शक्यता

  • ते म्हणाले की, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एकच अट आहे की, त्या व्यक्तीने त्याच्या मूळ राज्यातून मतदार नोंदणी रद्द केली असावी.
  • आयोगाच्या या निर्णयामुळे सुमारे २० ते २५ लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन आयोगाचा अहवाल लागू झाल्यानंतर विधानसभेच्या जागांची संख्या ९० झाली आहे. विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याने सध्याच्या मतदार याद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे.
आता नव्या रचनेनुसार मतदार यादी तयार करण्यात येत आहे.संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र जम्मू-काश्मीरमध्ये १५ ऑगस्टची तयारी पाहता ती स्थगित करण्यात आली होती.यापूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती, मात्र ती आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.


Tags: Election CommissiomJammu Kashmirजम्मू आणि काश्मीरनिवडणूक आयोगमतदान
Previous Post

पूरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

Next Post

#मुक्तपीठ LiVE #महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानसभा १८ ऑगस्ट २०२२

Next Post
#मुक्तपीठ LiVE #महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानसभा १८ ऑगस्ट २०२२

#मुक्तपीठ LiVE #महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानसभा १८ ऑगस्ट २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!