Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात प्रथमच २९ किमी साउंड अॅंड लाइट प्रूफ फोरलेन, रस्त्याच्या आजूबाजूला वाघ

November 10, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
नितीन गडकरी

मुक्तपीठ टीम

विकास म्हटलं की विनाश ठरलेलाच, असाच अनेकदा समज होतो. हा गैरसमज होण्याचे कारण निसर्गाच्या हानीचा विचार करत, ती टाळण्याची व्यवस्था करतही विकास होऊ शकतो हेच अनेकांना पटत नाही. त्यातही सत्तेत बसलं की मनमानीचं प्रदूषण होतं आणि काहीच चुकीचं वाटत नाही. पण नागपूर ते सिवनी राष्ट्रीय महामार्ग ४४चा २९ किलोमीटरचा टप्पा अपवाद आहे. मोहगाव-ख्वासा दरम्यान हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. हा देशातील पहिला साउंड अॅंड लाइट प्रूफ चौपदरी महामार्ग आहे. निसर्गाशी फारशी छेडछाड न करता विकासाचे उत्तम उदाहरण हा पर्यावरणस्नेही महामार्ग उदयास आलाय. हा महामार्ग ९५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. या महामार्गाखालील अंडरपासमधून वाघांसह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर जा ये करतात.

 

महामार्गावर नॉइज बॅरियरचा पहिल्यांदाच वापर

  • देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच महामार्ग आहे, ज्यावर २९ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नॉईज बॅरिअर्स वापरण्यात आले आहेत.
  • दोन्ही बाजूंना ध्वनी प्रतिबंधक बसवल्यामुळे अवजड वाहनांचा हलका व मोठा आवाज वन्य प्राण्यांपर्यंत पोहोचत नाही. याच कारणामुळे या रस्त्याला देशातील पहिला ध्वनी आणि प्रकाशरोधक रस्ता म्हणूनही नाव मिळाले आहे.

 

साउंड अॅंड लाइट प्रूफ महामार्गामध्ये अॅनिमल अंडरपासचे बांधकाम

  • पेंच राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगल आणि बफर परिसरातून जाणाऱ्या या साउंड अॅंड लाइट प्रूफ महामार्गामध्ये १४ अॅनिमल अंडरपास बनवण्यात आले आहेत.
  • हे अॅनिमल अंडरपास या रस्त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ३. मोहगाव-कुरई दरम्यान ११ अॅनिमल अंडरपास बांधण्यात आले आहेत.
  • रुखडमध्ये बांधण्यात आलेला अॅनिमल अंडरपास १४०० मीटर लांब आहे.
  • उड्डाणपुलावर बांधण्यात आलेल्या सर्व अॅनिमल अंडरपासमुळे वन्य प्राण्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल.
  • सर्व प्राण्यांच्या अंडरपासमध्ये विशेष पेंटिंग करण्यात आली आहे जेणेकरून ते खाली जात असताना त्यांना जंगलासारखे वाटावे.

 

पेंच-कान्हा कॉरिडॉरमुळे वर्षानुवर्षे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयात मंजुरीसाठी रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाचे काम अखेर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १० ऑगस्ट २०१८ रोजी सुरू केले. हा रस्ता तयार करणाऱ्या दिलीप बिल्डिकॉन कंपनीला मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, आणि दीड महिन्यापूर्वीच प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.

 

नितीन गडकरींनी कौतुक केले

  • देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही हा साउंड अॅंड लाइट प्रूफ महामार्ग खूपच आवडला आहे.
  • या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले होते, त्यानंतर त्यांनी कुरई घाट विभागाची पाहणी केली.
  • रुखड येथे बांधलेल्या सर्वात लांब अॅनिमल अंडरपासच्या खालीही ते गेले. तेव्हाही त्यांनी या प्रकल्पाच्या कामाचे भरभरून कौतुक केले होते.

पाहा व्हिडीओ : 


Tags: muktpeethpench national parkSound and light proof forlaneनितीन गडकरी
Previous Post

डॉ. कमल रणदिवे: गेल्या शतकावर ठसा उमटवणाऱ्या आद्य जैव वैज्ञानिक!

Next Post

यूनेस्कोच्या क्रिएटीव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेशाचा श्रीनगरला सन्मान

Next Post
shrinagar

यूनेस्कोच्या क्रिएटीव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेशाचा श्रीनगरला सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!