मुक्तपीठ टीम
गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुरुंगात आहेत. आता गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुंबईत परत एकदा ईडीची छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी काही नगरसेवकांची नावेही समोर आल्याने आता पुढील तपास सुरु झाला आहे. ही छापेमारी मुंबईत सुरु असल्याने यामध्ये आता कोणाचा नंबर लागणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ईडीचे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल
- संजय राऊताांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारीला सुरवात केली आहे.
- ईडीचे लोकेशन समजू शकले नसले तरी राऊतांनंतर आता कारवाई कुणावर होणार हे पहावे लागणार आहे.
- मध्यंतरी याप्ररकरणी काही नगरसेवकांची देखील नावे समोर आली होती.
- त्यानुसार ही छापेमारी सुरु झाली का हे पहावे लागणार आहे.
- मुंबईतील काही ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरु आहे.
- ईडीचे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
याआधीही केले होते दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन!!
- पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर ईडीने मुंबईतील दोन ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केले होते.
- यामध्ये काही महत्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागलेली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीकडून छापेमारी सुरु झालीी आहे.
- यामध्ये काय माहिती समोर येते आणि यामध्ये आणखी कोणाचा समावेश असणार हे देखील समजले जाईल.
- परंतु, बुधवारी दुपारपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नव्हती.