Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळकरी मुलांचा काहीतरी नवीन करण्याच्या ध्यास, फुटबॉल खेळणाऱ्या रोबोटचा केला आविष्कार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
robot playing football

मुक्तपीठ टीम

परदेशात लोक मोठ्या प्रमणात रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. तर, हळूहळू भारतातही हे तंत्रज्ञान अवलंबले जात आहे. आतापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी रोबोटच्या मदतीने काम सोपे करण्याबद्दल आपण ऐकलं असेल. पण बिहारमधील पाटणा आणि आराहच्या शाळकरी मुलांनी एक जबरदस्त पाऊल उचलत चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांनी फुटबॉल खेळणारा रोबोट तयार केला आहे. फुटबॉल मैदानावर खेळाडू जसे खेळतात तसे, हा रोबोट मॅटवर फुटबॉल पास करताना, बचाव करताना, मारताना आणि किक मारताना दिसतो. श्रीकृष्ण विज्ञान केंद्रात चालणाऱ्या इनोव्हेशन हबमधील ६ मुलांनी हा रोबोट तयार केला आहे. या मुलांनी काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासातून फुटबॉल खेळणारा रोबोट तयार केला आहे.

हा रोबोट जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रदर्शित केला जाईल

  • रोबोटिक्समध्ये रुची असलेल्या या मुलांनी स्वत:ला एक वेगळे स्थान तयार केले आहे. त्यातून रोबोटची रचना केली आहे.
  • ही मुले इयत्ता ११वी आणि १२वी मध्ये शिकतात. विशेष म्हणजे यातील चार मुले सरकारी शाळेतील विद्यार्थी आहेत.
  • रोबोटची रचना करणाऱ्या टीमचे कॅप्टन हरिओम शरणम सांगतो की, टीममधील सर्व सदस्य रोबोटिक्सच्या क्षेत्रात आपलं करिअर शोधत आहेत.
  • हरिओमने सांगितले की, विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक गौरव कुमार आणि इंटरनेट यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी हा रोबोट तयार केला आहे.

जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी रोबोट तयार केला

जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी या मुलांच्या मनात रोबोट्स तयार करण्याची भावना निर्माण झाली. या चॅम्पियनशिपच्या एका प्रकारात त्याला रोबो सॉकर स्पर्धेची माहिती मिळाली, त्यानंतर सहा जणांच्या टीमने हा खेळाडू रोबोट तयार करण्यास सुरुवात केली. मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली मुलांनी रोबोटचे कार्य तत्त्व समजून घेऊन रोबोट तयार केला. रोबोट बनवण्यासाठी १० दिवस लागले. तसेच रोबो तयार करण्यासाठी त्यांना सहा ते सात हजार रुपये खर्च करावे लागतात.

मोबाईल फोनवरून नियंत्रित करता येणारा रोबोट

  • रोबोटिक्स चॅम्पियनशिप आणि रोबो सॉकर स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना ३० सेमी लांबी आणि रुंदीचा रोबोट तयार करायचा होता.
  • या मुलांनी गेमच्या नियमांनुसार रोबोटला उर्जा देण्यासाठी १२०० एमएएचच्या सहा बॅटरी आणि ५०० आरपीएमची मोटर वापरली आहे.
  • त्याचबरोबर हा रोबो चालवण्यासाठी Arduino मायक्रो कंट्रोलरचा वापर करण्यात आला आहे.
  • हा रोबोट मोबाईल फोनद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. यासोबतच फ्लाय स्काय रेडिओ रिमोटने नियंत्रित करता येतो.

जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान दिल्लीत होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत ५३ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ३०० संघांनी नोंदणी केली आहे. रोबो सॉकर प्रकारात, एका संघाला तीन रोबोट तयार करावे लागतात, ज्यामध्ये एक डिफेंडर, स्ट्रायकर आणि गोलकीपर रोबोट असेल. याशिवाय या चॅम्पियनशिपमध्ये आणखी नऊ श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यात फास्टस लाईन फॉलोअर, रोबो रेस, इनोव्हेशन पर्थ इत्यादींचा समावेश आहे.

 


Tags: good newsmuktpeethrobot playing footballrobot technologySchool childrenघडलं-बिघडलंचांगली बातमीफुटबॉल खेळणारा रोबोटमुक्तपीठरोबोट तंत्रज्ञानशाळकरी मुलं
Previous Post

“देवेंद्र फडणवीसांचं असं का झालं? आता बेरजेचं राजकारण करणार?”

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: महाराष्ट्रात ९ ते १७ ऑगस्ट “स्वराज्य महोत्सव”

Next Post
Swatantrya Amrit Mahotsav

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: महाराष्ट्रात ९ ते १७ ऑगस्ट "स्वराज्य महोत्सव"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!