Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिलन-२२ नौदल सरावाचं थाटात उद्घाटन, परदेशी नौदलांचा सहभाग

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
participation of foreign navies in Inauguration of Milan-22 naval exercise

मुक्तपीठ टीम

मिलन-२२ या बहुराष्ट्रीय द्विवार्षिक नौदल सरावाचा उद्घाटन समारंभ विशाखापट्टणम येथील नौदल प्रेक्षागृहात पार पडला. मिलन सरावाचे हे ११ वे वर्ष असून पूर्व नौदल कमांडतर्फे प्रथमच विशाखापट्टणमच्या सिटी ऑफ डेस्टिनी या बंदरात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. यापूर्वी झालेला प्रत्येक सराव अंदमान-निकोबार कमांडच्या तिन्ही सेनादलांच्या नेतृत्वाखाली पोर्ट ब्लेयर येथे होत असे. या वेळच्या सरावात मित्रदेशांची १३ जहाजे, ३९ प्रतिनिधी मंडळे आणि एक सागरी गस्त विमान सहभागी होत आहे. हे मोठे संमेलन मिलन या शब्दाचे महत्त्व आणि त्याचे सामर्थ्य दाखविते कारण मिलन या शब्दाचा हिंदी भाषेतील अर्थ एकत्र येणे किंवा सर्वांनी एकत्रितपणे काही करणे असा होतो.

 

 

मिलन सरावामधून समान विचारांच्या नौदलांमध्ये “सौहार्द, एकसंधपणा आणि सहयोग” निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हे साध्य करण्यासाठी व्यावसायिक पातळीवरील विचारांची देवाणघेवाण, बंदरांच्या ठिकाणी अनुभवांचे आदानप्रदान आणि बहुराष्ट्रीय सागरी मोहिमांसह समुद्रातील अधिक उत्तम आंतरपरिचालन वाढविणे यासारखे प्रयत्न करण्यात येतात. या सरावाचा बंदराच्या ठिकाणचा टप्पा २८ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल आणि त्यानंतर १ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२२ या काळात सरावाचा सागरातील टप्पा सुरु होईल.

 

 

मिलन नौदल सरावाचे या वर्षीचे सत्र, पूर्वीच्या सर्व सरावांपेक्षा अधिक मोठे आणि अधिक गुंतागुंतीचे आहे. या सरावातून सागरी क्षेत्रातील एक जबाबदार आणि विश्वासार्ह सहकारी म्हणून भारताच्या वाढत्या लौकीकाचे दर्शन होते आणि जागतिक पटलावर भारतीय नौदलाची सागरी सुरक्षेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित होते.

 

 

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह सहभागी देशांचे राजदूत, उच्चायुक्त, उपस्थित होते. तसेच इतर नौदल प्रमुख अधिकारी, प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख आणि या सरावात भाग घेणाऱ्या सर्व जहाजांचे कमांडिंग ऑफिसर्स आणि कर्मचारीवर्ग देखील यावेळी उपस्थित होता. या सोहोळ्यानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एक विशेष लिफाफा तसेच मिलन सरावावरील एक चित्रपट प्रकाशित करण्यात आला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian NavyMILAN - 22अजय भट्टअॅडमिरल आर. हरिकुमारनौदलमिलन-२२
Previous Post

हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गा ऊरुसाला चर्मकार समाजाच्या गलेफ अर्पणाने प्रारंभ

Next Post

एमिटी युनिव्हर्सिटीत ‘म मराठीचा’ कॅलिग्राफी कार्यशाळा, अमराठी विद्यार्थ्यांना शिकवली देवनागरी लिपी

Next Post
Calligraphy Workshop in MET on occassion of marathi language day

एमिटी युनिव्हर्सिटीत ‘म मराठीचा’ कॅलिग्राफी कार्यशाळा, अमराठी विद्यार्थ्यांना शिकवली देवनागरी लिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!