Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तीन कृषी कायद्यातील एक कायदा लागू करण्याची संसदीय समितीची शिफारस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Farmers protest

मुक्तपीठ टीम

 

एकीकडे मोदी सरकारच्या तीन कृषि कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने त्यातील एक कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा समावेश असणाऱ्या संसदीय समितीने १९५५च्या जुन्या कायद्यात बदल करून अस्तित्वात आलेल्या २०२०च्या जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे शेतकऱ्यांचा लाभ होईल असे म्हटले आहे.

 

संसदेच्या अन्न, ग्राहक, व्यवहार आणि सार्वजनिक वितरणविषयक स्थायी समितीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, आपसह १३ वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचा सहभाग आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. स्थायी समितीचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला आहे. समितीने अशी आशा व्यक्त केली आहे की, अलीकडेच लागू करण्यात आलेल्या ‘आवश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा लागू केल्यास देशातील कृषी क्षेत्रात न वापरलेली दारे उघडू शकेल.

 

समितीने कायदा लागू करण्याची शिफारस का केली?

• कायद्यात म्हटल्याप्रमाणे पायाभूत सुविधा मिळाव्यात
• जास्त पीक आलं तरीही शेतकऱ्यांचं नुकसानच होतं
• साठवणूक व्यवस्था नसल्यानं भाव पडतात, शेतकरी तोट्यातच जातो
• कोल्ड स्टोरेज, गोदामे, प्रक्रिया प्रकल्प, निर्यात व्यवस्था तयार झाली तर पीकाला भाव मिळेल, शेतकऱ्याला लाभ मिळेल

 

या कायद्याच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात वाढीव गुंतवणूक निर्माण होण्यास मदत होईल, ज्यातून कृषी विपणनात निष्पक्ष आणि उत्पादक स्पर्धा होईल आणि शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ होईल. समितीने हे फायदे लक्षात घेत ‘आवश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२०’ लागू करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे. तसेच पॅनेलचे म्हणणे आहे की, सरकारने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरुन कृषी क्षेत्राशी संबंधित शेतकरी व इतरांना लवकरात लवकर या कायद्यात नमूद केलेले लाभ मिळू शकतील.

 

देशातील बहुतेक कृषी उत्पादनांचे आता अतिरिक्त पीक येत आहे, तसेच शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज, वेअरहाउसेस आणि निर्यात सुविधांमधील कमी गुंतवणूकीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांचे चांगले भाव मिळणे कठीण जात आहे.

 

अहवालात सांगण्यात आले आहे की, आवश्यक वस्तू कायदा १९५५ मध्ये शेतकर्‍यांना प्रक्रिया व निर्यातीसाठी चालना देणारे काही नव्हते. त्यामुळे भरपूर पीक घेऊनही शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानास समोरे जावे लागत असे. नव्या कायद्यामुळे तसे होणार नाही.


Previous Post

#व्हाअभिव्यक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कारभार सुधारावा!

Next Post

एक सुमित गेला…आणखी बळी नकोच! शिक्षकभरतीचे दार उघडा…सरकार दार उघडा…

Next Post
sumit raut suicide

एक सुमित गेला...आणखी बळी नकोच! शिक्षकभरतीचे दार उघडा...सरकार दार उघडा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!