मुक्तपीठ टीम
ज्यांनी जगात केवळ आणलंच नाही तर जगायलाही शिकवलं…त्या जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्यच. काही ते टाळतात. आई-वडिलांचे हाल करतात. आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणे आता कृतघ्न मुलांना परवडणार नाही. कारण जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करत नसल्याने लातूरमधील झेडपी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३०% कपात सुरु झालीय. तो पैसा थेट आई-वडिलांच्या खात्यात जातोय.
लातूर जिल्हा परिषदेने वृद्ध पालकांची काळजी न घेतल्यामुळे सात कर्मचार्यांच्या पगारामधून ३० टक्के कपात करण्यास सुरवात केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, पालकांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल १२ कर्मचाऱ्यांची तक्रार नोंद झाली होती. त्यातील सहा शिक्षक आहेत. वजा केलेली रक्कम या कर्मचाऱ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली गेली.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या महासभेने आपल्या पालकांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ३० टक्क्यांनी कपात करण्याचा ठराव मंजूर केला होता. ही प्रक्रिया डिसेंबर २०२० पासून सुरू झाली.
पाहा व्हिडीओ: