मुक्तपीठ टीम
देशातील श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तरूणाईला हृदयस्पर्शी असा अमूल्य सल्ला दिला आहे. जो आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, 4G-5Gच्या या जगात आई-वडिलांपेक्षा कोणीही मोठे नाही.
नेटवर्कच्या प्रगतीवर बोलत असताना मुकेश अंबानींनी दिला ‘हा’ सल्ला!
- गांधीनगर येथील पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटीमध्ये नेटवर्कच्या प्रगतीवर बोलत असताना मुकेश अंबानींनी हे सांगितले.
- मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी हरकत नाही.
- तरुणाईला 4G आणि 5G चे कितीही वेड लागले असले तरी आई-वडिलांपेक्षा मोठा कोणीच असू शकत नाही.
- मुकेश अंबानींचा हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.
“तुमच्यासाठी तुमच्या आई-वडिलांनी दिलेल्या बलिदानाची तुलना कोणीही करू शकत नाही. तुमचे पालक तुम्हाला पदवीधर म्हणून लवकरात लवकर पाहू इच्छित आहेत. हे त्याचे वर्षानुवर्षे स्वप्न होते. पण तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड अतुलनीय आहे. तुम्ही त्याला कधीही विसरणार नाही.” मुकेश अंबानी आपल्या भाषणात हे म्हटलं आहे.