Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॅरामेडिकल कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणासाठी सरकारचे संस्थांना आवाहन

व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संधी

September 6, 2026
in आरोग्य, करिअर, सरकारी बातम्या
0
Para Medical training

मुक्तपीठ टीम

साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमा मध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक शासकीय व खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी तसेच या योजनेतून प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

 

पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळ निर्मिती

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत आरोग्य क्षेत्र अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. तथापि या क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे दिसून येते. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही कमतरता नसावी, या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ योजना सुरु केली आहे. याअन्वये सर्व शासकीय रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था व 20 खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या खाजगी रूग्णालयांना आरोग्य क्षेत्रातील निवडक 36 अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देवून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याकरीता व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत प्रशिक्षणाचा भर हा प्रत्यक्ष कामकाजाअन्वये प्रशिक्षणावर (On Job Training) असणार आहे.

तसेच केंद्र शासनाने पंतप्रधान कौशल्य विकास योजना ३ अंतर्गत विशेष प्रकल्वान्वये  Emergency Medical Technician– Basic, General Duty Assistant (GDA), GDA – Advanced (Critical Care, Home Health Aide, Medical Equipment Technology Assistant व Phlebotomist अशा संबंधित सहा जॉब रोल्सकरीता मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थाद्वारे अल्पमुदतीचे व प्रत्यक्ष कामकाजान्वये प्रशिक्षणावर (On Job Training) भर देणारे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

या योजनांमध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबईतील इच्छूक शासकीय, खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना हे प्रशिक्षण विनाशुल्क असेल.

मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील रुग्णालये तसेच इच्छूक उमेदवारांनी दुरध्वनी क्रमांक ०२२-२२६२६४४० व  ०२२-२२६२६३०३ यावर किंवा mumbaisuburbanrojgar@gmail.com अथवा mumbaicity.employment@gmail.com  या ईमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


Tags: Maharashtrapara medicalpara medical skill trainingपॅरा मेडिकलपॅरा मेडिकल प्रशिक्षणमहाराष्ट्र
Previous Post

राज्यात नव्या रुग्णांची संख्या २० हजाराखाली! आता फक्त सातारा, कोल्हापूर, नगर, पुणे, मुंबई हजारावर!  

Next Post

पती देशासाठी शहीद, कॉर्पोरेट सोडून ‘ती’ देशसेवेसाठी सैन्यात

Next Post
nitika

पती देशासाठी शहीद, कॉर्पोरेट सोडून ‘ती’ देशसेवेसाठी सैन्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!