मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी रस्त्याच्या कामावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहिले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात बराच वाद रंगला. पण आता गडकरींना रस्त्यांच्याच मुद्द्यावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पत्र लिहिणार आहेत. पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या असून आपण यासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.
राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चांगल्या सक्रिय बनल्या आहेत. त्यांनी आज ट्वीट करून पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग ७५२ ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत…माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही… तात्काळ दखल घेतली जाईल… असे लिहिले आहे.
पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत…माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही… तात्काळ दखल घेतली जाईल… pic.twitter.com/2Txjdc6hXa
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 19, 2021
केंद्रीय दळणवळण खात्यामार्फत देशभरात रस्त्यांची जोरात कामं सुरू आहेत. राज्यात दरवर्षी संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण ते पंढरपूर येथून आषाढी वारी निघते. सध्या या रस्याचे काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. यामुळे याकडे सरकारचे लक्ष साधण्यासाठी पंकंजा मुडे या केंद्रीय मंत्री गडकरींना पत्र लिहिणार आहेत.
राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे आता त्या केंद्रीय मंत्री गडकरींना नेमकं पत्रात काय लिहिणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहेत.