उदयराज वडामकर / कोल्हापूर
भारत आपला देश हा विविधतेने नटलेला. प्रत्येक राज्य आणि त्या राज्यांमधील प्रत्येक विभाग हा वेगळी परंपरा असलेला. कोल्हापूरच्या रेणुका देवीची पालखी असाच एक सोहळा. तृतीयपंथी भक्तांची अलोट गर्दी लोटते. वाद्यांच्या तालावर देहभान विसरत सारे भक्त आईच्या आराधनेत तल्लीन होतात.
कोल्हापूरमध्ये श्री रेणुका देवी म्हणजेच यल्लमा देवी मंदिर हे भक्तांच्या आकर्षणाचं स्थान आहे. भक्ती आणि शक्तीचा उत्सव म्हणून देवीच्या पालखी व जग सोहळ्याकडे पाहिलं जातं. त्यातही देवीचे तृतीयपंथी भक्त अधिकच उत्साहात या सोहळ्यात सहभागी होतात. नुकताच कोल्हापुरात हा सोहळा साजरा झाला.
श्री रेणुका देवीची पालखी दरवर्षी निघते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी भक्तांचा उत्साह अधिकच जास्त होता. देवीचा स्नान सोहळा पंचगंगेत तीरावर संपन्न झाला आणि तेथून मग मंदिरापर्यंत मिरवणूक गेली.
रेणुका भक्तांच्या जल्लोषात ही मिरवणूक आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडली.
पालखी मिरवणुकीची प्रथा
- प्रथेप्रमाणे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्री रेणुका देवी पालखीतून स्नान करण्यास पंचगंगेला जातात.
- श्री रेणुका देवीचे तृतीयपंथी भक्तगण गाण्याच्या व वाद्यांच्या तालावर तालावर देहभान विसरून आनंद साजरा करतात.
- कोल्हापूर मधील चार जग पंचगंगेच्या तिरी स्नान सोहळा होतो. त्यानंतर पालखी समवेत श्री तुळजाभवानी मंदिर, श्री अंबांमाता मंदिर अशा भेटी देत पालखी श्री रेणुका मंदिरापर्यंत जाते.