Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी ‘पालक’ भाजी झाली स्मार्ट, स्फोटकं शोधणार, स्वत:च मेलने कळवणार

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
palak

मुक्तपीठ टीम

 

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीतील वैज्ञानिकांनी पालकची अशी रोपं तयार केली आहेत, जी ईमेल करू शकतात. एमआयटीच्या वैज्ञानिकांनी नॅनोटेक्नॉलजीच्या मदतीने पालकची नवी वेगळी रोपं तयार केली आहेत. ही पालक सेन्सरचे काम करते जी स्फोटक पदार्थांना ओळखण्यास मदत करते. ही पालकची रोपं कोणत्याही स्फोटक पदार्थांची माहिती मिळाल्यानंतर तार किंवा कोणत्याही इतर यंत्राच्या सहाय्याविना आपली माहिती वैज्ञानिकांना पाठवू शकतील.

 

एमआयटीच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, “पालकच्या मुळांना जमिनीतील पाण्यात नायट्रोएरोमेटिक्स असल्याची माहिती मिळेल तेव्हा पालकच्या पानात असलेले कार्बन नॅनोट्यूब सिग्नल देतील.”

हे सिग्नल इन्फ्रारेड कॅमेर्‍याद्वारे वाचले जातील आणि वैज्ञानिकांपर्यंत तात्काळ एक अलर्ट मेसेज पोहोचेल. नायट्रोएरोमॅटिक्स हे एक कंपाऊंड आहे, जे भूसुरुंगासारख्या स्फोटकांमध्ये आढळते. हा प्रयोग इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विस्तृत संशोधनाचा एक भाग आहे.

 

या तंत्रज्ञानास ‘प्लांट नॅनोबॅायोनिक्स’ असे नाव देण्यात आले आहे आणि ते पालकला नवीन क्षमता प्रदान करीत आहेत. प्रा. मायकेल म्हणाले, “वनस्पतींची मुळे जमिनीच्या आत पसरलेली असतात आणि ते सतत जमिनीच्या आतील पाण्याचे नमुने घेत असतात आणि पाणी वाहून पानांपर्यंत नेण्याची क्षमता त्यांच्यात असते.” वनस्पती आणि मानव यांच्या संवादातील अडथळा दूर करण्याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

 

या संशोधनाचा उद्देश स्फोटकांचा शोध घेणे हे आहे, तसेच याच्या मदतीने वैज्ञानिकांना प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय परिस्थितीबद्दल माहिती मिळेल.

 

प्रोफेसर स्ट्रॅनो यांनी वनस्पतींमध्ये प्रदूषक शोधण्यासाठी नॅनो पार्टिकल्सचा वापर केला. यावेळी संशोधक नाइट्रिक ऑक्साईड शोधण्यात यशस्वी ठरले. हे प्रदूषक काही जळल्याने निर्माण होतात. स्ट्रॅनो म्हणाले की, “झाडे पर्यावरणदृष्ट्या खूप प्रतिक्रियाशील असतात.”

 

मातीतील बदल, दुष्काळ किंवा पाण्याच्या बदलाची संभाव्यता याची जाणीव होते. याद्वारे रासायनिक सिग्नल योग्य मार्गाने दर्शविले गेले तर मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली जाईल.

 

पालक हे कार्बन नॅनोशिट्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकते आणि ते धातूनिर्मित हवेच्या बॅटरी आणि इंधन सेल्सना अधिक प्रभावी बनविण्यासाठी मुख्य स्त्रोत किंवा उत्प्रेरक ठरु शकतात. सध्या वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीसाठी मेटल एअर बॅटरी अधिक प्रभावी पर्याय आहेत. शास्त्रज्ञांनी पालक यासाठी निवडले आहे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि नायट्रोजन आढळतात जे उत्प्रेरकाची भूमिका निभावण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे.

 

पाहा व्हिडीओ


Tags: AlertEmailPalakPlant NanobionicsResearchervegetableअमेरिकाअलर्टईमेलपालकप्लांट नॅनोबॅायोनिक्ससंशोधक
Previous Post

१५ फेब्रुवारीपासून चला कॉलेजला…अखेर निर्णय!

Next Post

#चांगलीबातमी महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार

Next Post
coivd

#चांगलीबातमी महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!