मुक्तपीठ टीम
भारतात होणाऱ्या टी-२० विश्व चषकाच्या सामन्यांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा दिला जाणार आहे त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा भारतात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना अहमबदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्वोच्च परिषदेची बैठक झाली. या बैठकीत टी-२० विश्व चषकाचे सामने कोणत्या शहरांमध्ये आयोजित करायचे यासंबंधित निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सामन्यांमध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघ सहभागी होण्यास संमतीचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या स्पर्धेचे आयोजन नऊ शहरांमध्ये होणार असल्याचे बैठकीत निश्चित झाले आहे. तसेच स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर निश्चित झालेल्या शहरांना तयारी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या नऊ शहरात होणार सामने
- दिल्ली
- मुंबई
- हैदराबाद
- धर्मशाला
- चेन्नई
- बेंगळुरू
- लखनऊ
कोलकत्ता
अहमदाबाद
मात्र, कोरोनाच्या महामारीची तीव्रता लक्षात घेऊन अंतिम निर्णय स्पर्धेच्याआधी घेतला जाणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या व्हिसासंदर्भातील प्रश्न सदर बैठकीत सुटला आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने पाकिस्तानी संघाला व्हिसा देण्याचे आश्वासन दिले आहे. पण सामना पाहण्यासाठी पाकिस्तानी चाहते येऊ शकतात की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.