मुक्तपीठ टीम
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. एका न्यायालयाच्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. येथील पीटीएचे प्रवक्ते खुर्रम मेहरान म्हणाले की, संस्था न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल. यासंदर्भात पेशावर येथील उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. टिकटॉकच्या माध्यमातून अनैतिक आणि अश्लील साहित्याचा प्रसार होत असल्याची तक्रार पीटीएकडे करण्यात आली होती. जवळपास सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती.
पाकिस्तानमध्ये टिकटॉक अॅप डाउनलोड करणारे सर्वाधिक युजर्स आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून अनैतिक आणि अश्लील साहित्याचा प्रसार होत असल्याची तक्रार पीटीएकडे करण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच ‘टिकटॉक’वर कारवाई करण्यात आली असल्याचे पीटीएने म्हटले आहे.
टिकटॉकवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओला पाकिस्तानी समाजात स्वीकारले जात नसल्याचे न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले. दरम्यान, या मुद्यावर टिकटॉकने म्हटले की, आम्ही सातत्याने व्हिडीओ तपासत आहोत. नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अकाउंटवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक अकाउंट बंद करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या कराचीमध्ये टिकटॉकवर प्रसारीत केलेल्या एका व्हिडीओमुळे दोन गटांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होता. यात १६ जण जखमी होते. या सर्वांना कराचीच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारताने ही गेल्या वर्षी जून महिन्यात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि आता पाकिस्तानमधील मोठा युजर हातून गेल्याने चीनला मोठा धक्का बसला आहे.