मुक्तपीठ टीम
पाकिस्तानात काहीही धड सुरू नसते. अल्पसंख्यांकांच्या हिताबद्दल भारताला शिकवण देणारा पाकिस्तानाचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आला आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त छळ हा अहमदिया समाजाचा होतो. अहमदिया स्वत:ला मुसलमान मानतात, पण ते मुसलमान असल्याचे पाकिस्तानला मान्य नाही. अहमदिया मुसलमानांवर होणारा अत्याचार आणि त्यांच्याशी भेदभावाचे वर्तन हे सारं पाकिस्तान क्रूर असल्याचा पुरावाच आहे.
रविवारी पेशावरमध्ये एका अहमदिया मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आली. पेशावरमधील बाजीदखेल भागात एका डॉक्टरची हत्या करण्यात आली कारण तो अहमदिया समाजाचा होता. पाकिस्तानमधील अहमदिया पंथीयाची ही पहिली हत्या नाही. पाकिस्तानात ही एका वर्षात आतापर्यंत पाचवी हत्या आहे. पूर्वीपासून पाकिस्तानमध्ये या समाजाचा छळ होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारचाही त्यांच्यावर अत्याचार करण्यात थेट सहभागी आहे. त्यामुळेच मुसलामान असणाऱ्या अहमदियांना पाकिस्तान का आपलं मानत नाही, का त्यांचा छळ केला जातो? ज्यांनी पाकिस्तानच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या अहमदिया समाजाचा पाकिस्तानात छळ का होतो, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न:
पाकिस्तानची घटना अहमदियांना मुसलमान मानत नाही!
- पाकिस्तानमधील ४० लाख अल्पसंख्याक अहमदी हे दहशतीच्या भीतीखाली जगत आहेत.
- त्यांना त्यांच्याच देशात आक्षितासारखे राहावे लागते.
- त्यांचा फार पूर्वीपासून अत्याचार आणि छळ होत आहे.
- याला पाकिस्तानची राज्यघटनाही जबाबदार आहे.
- पाकिस्तानची राज्यघटना अहमदियाला मुसलमान मानत नाही.
- १९७४ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी अहमदिया मुसलमान नसल्याचे जाहीर केले.त्यासाठी भुत्तोंनी राज्यघटनेत दुरूस्ती केली.
- एकदा अहमदिया मुस्लीम नसल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होत गेली.
अहमदियांना का आपलं मानत नाहीत मुसलमान?
- मुसलमान समाजाचे लोक इस्लामी कायदा आणि इस्लामिक इतिहासाबद्दलच्या त्यांच्या विचारसरणीनुसार वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागले गेले.
- अहमदिया पंथाचे मिर्झा गुलाम अहमद हे अहमदियांच्या मते नबीचा अवतार आहेत.
- हनफी इस्लामिक कायद्याचे पालन करणारा मुस्लिमांचा समाज स्वत:ला अहमदीया म्हणवतो.
- या समाजाची स्थापना मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती.
- त्यांचे अनुयायी त्यांना प्रेषित मानतात.
- इस्लामच्या मान्यतेनुसार मुसलमान मोहम्मद पैगंबर यांना शेवटचे प्रेषित मानतात.
- हा त्यांच्यातला तीव्र मतभेदाचा मुद्दा आहे.
- अहमदिया समाजातील लोक अत्यंत शांतताप्रिय असतात.
- शिक्षणाच्या क्षेत्रातही ते बऱ्यापैकी पुढे आहेत.
- संस्थापकांच्या नावाने ते अहमदिया म्हणून ओळखले जातात. अहमदिया असे मानतात की, ईश्वराने मिर्झा गुलाम अहमद यांना पृथ्वीवर धार्मिक युद्ध आणि हिंसाचार संपविण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवले.
- मस्जिद आणि राष्ट्र हे दोन्ही वेगवेगळे आहेत.
- त्यांच्या भूमिकाही वेगवेगळ्या आहेत, असे हा समाज मानतो.
पाकिस्तानात अहमदियांचा छळ नेहमीचाच…
- पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांचा नेहमीच छळ होतो.
- २०१० मध्ये एका हल्ल्यात अहमदिया समाजातील ९३ लोकांचा मृत्यू झाला होता.
- २६ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या मानवाधिकार अहवालानुसार जुलै २०२० पासून अहमदिया समाजातील लोकांना पाकिस्तानमध्ये लक्ष्य केले जात आहे.
- सात महिन्यांत सुमारे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
- या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान प्रशासनाने अहमदीयावरील अत्याचाराकडे दुर्लक्ष केले आहे.
- एवढेच नव्हे तर पाकिस्तान सरकार त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांसाठी उद्युक्त करत आहे.
- पाक कायद्यानुसार अहमदिया समुदायाचे धार्मिक स्वातंत्र्य संरक्षित नाही, त्यांच्या अस्तित्वाचा मान्यता नाही.
- मानवाधिकारवाद्यांनीही चिंता व्यक्त केली आहे